पेठ : नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटी आणि हॉरिझन अकॅडमी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाचलोंढी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दीपावलीनिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शालेय पाठ्यपुस्तके, वर्क बुक, कंपास पेटी आदिंसह गणवेशचे वाटप करण्यात आले. राजेश साहेब, रंजना चव्हाणके, पौर्णिमा भुसारे, हॉरिझन अकॅडमीचे कार्तिक जोर्वेकर, मीत देवरे, सुकृत राहाणे, संगीता धुमाळ, मानसी गोळेसर, साक्षी वाघ, अथर्व सोपे, स्वराज पाटील, ओम लाहारे, वेदिका सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक हरिदास वाघेरे, मीरा पालवे, शांताराम शेंडे, भगवान हिरकूड, उमाकांत घुटे, सखाराम चौधरी, पारे सर, वैभव शिंदे यांच्यासह विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
नाचलोंढी येथे शैक्षणिक साहित्यवाटप
By admin | Updated: October 22, 2016 23:39 IST