ओझर : येथील अनेक वर्षांपासून रखडत पडलेल्या मुंबई आग्रा महामार्गा लगत जिल्हा परिषद शाळेचे काम एचएएलतर्फे पूर्ण झाले. त्याचे उदघाटन महाप्रबंधक व्ही.शेषगिरी राव यांच्या हस्ते करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून निर्लेखित झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत भग्न झाली होती. शाळेतील मुलांनी प्रचंड हाल अपेष्टा सहन करत शिक्षण घेत होते. ‘लोकमत’ने सातत्याने हा प्रश्न उचलून धरला होता. शाळेच्या पडीक जागेवर सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी लहान विद्यार्थ्यांनी मोकळ्या जागेत तिरंगा फडकवला. यात माजी शिक्षकांना अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर काही संस्थांनी यासाठी पुढाकार घेत मदतीचा हात देखील पुढे केला. एचएएलने सीएसआर फंडातून शाळा बांधून देण्याचे मान्य केले. अखेरीस वर्षभराच्या काळात दुमजली इमारत उभी राहून त्याचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना शेषगिरी राव यांनी एचएएलच्या स्थानिक विकास निधीतून ज्ञानमंदिर उभे करणे हे आमचे कर्तव्य असून या ज्ञान मंदिरातून भावी पिढी देशाचे नाव उज्ज्वल करील असा विश्वास व्यक्त केला. येथील जिल्हा परिषदेच्या मराठी मुले शाळा नंबर २ च्या इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्ही.शेषगिरी राव,माजी आमदार अनिल कदम,नगरपरिषदेचे सीईओ दिलीप मेनकर,दीपक सिंघल,साकेत चतुर्वेदी,सालेशकुमार मेहता,शिरीष भोळे, प्रदीप कुमार,संदीप बर्मन,सचिन ढोमसे,जितू जाधव,पांडुरंग आहेर,मुख्याध्यापक रजनी सोनवणे यांच्यासह पालक,शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक योगेश्वरी खैरनार यांनी केले.
-----------------------------------
लोकमतने टाकला प्रकाशझोत
विद्यार्थी व शिक्षक यांचे सातत्याने होणारे हाल अनेक महिने लोकमतने मांडले. त्यात शाळेचा आवार दिवसा विद्येचा तर रात्री मद्याचा झाला होता. तसेच प्रेमीयुगुलांचा राबता पाहता सदर शाळा उभारणे गरजेचे बनले होते. तातडीने शाळेच्या व्यवस्थापन समितीने एचएएलशी संपर्क साधत सुसज्ज इमारत मंजूर करून घेतली. यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हाल थांबणार असून मुलं देखील शाळेत येण्यास आतूर झाले आहे. माजी आमदार अनिल कदम यांनी अकरा लाखांचा निधी जाहीर केला. यात वॉल कंपाउंडसह इतर कामांसाठी सदर निधी खर्च होणार आहे.
===Photopath===
220621\1131752.jpg~220621\1ca3a69.jpg~220621\img-20210621-wa0040.jpg
===Caption===
पूर्वीचे फोटो~पूर्वी बातमी~जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उदघाटन प्रसंगी व्ही.शेषगिरी राव,माजी आमदार अनिल कदम,सचिन ढोमसे,पांडुरंग आहेर आदींसह अधिकारी व शिक्षक वृंद