शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक ॲप आवरा, शिक्षण सावरा अन् शाळा लवकर भरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:10 IST

जळगाव नेऊर : शासनाचे विविध शैक्षणिक ॲप, त्यात ग्रामीण भागात नेटवर्कची अडचण, अनेक मुलांकडे स्मार्ट फोनचा अभाव यामुळे शिक्षकांबरोबरच ...

जळगाव नेऊर : शासनाचे विविध शैक्षणिक ॲप, त्यात ग्रामीण भागात नेटवर्कची अडचण, अनेक मुलांकडे स्मार्ट फोनचा अभाव यामुळे शिक्षकांबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थी-पालक मेटाकुटीस आले असून, काहींना मोबाइल विकत घेण्याबरोबर, त्यासाठीचा नेट पॅक या खर्चाचा भार पेलणे कठीण झाले असून, पालक शिक्षकांनाच सांगताहेत की मोबाइल शिक्षण नको, शाळाच भरवा.

शासनाच्या शैक्षणिक ॲपमध्ये दीक्षा, वोपा, यू ट्यूब, महाकरिअर पोर्टल, गुरूशाला, क्लीन पास, गुगल मीट, टेलिग्राम, झूम, व्हाॅट्सॲप, बालभारती, टारगेट पिक, गो-टू वेबिनार, शेअर चॅट, काॅइन मास्टर, व्हिडिओ कॉल, कॉन्फरन्स कॉल, व्ही स्कूल या ॲपद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था विद्यार्थी गुणवत्तावाढीसाठी प्रयत्नशील आहेत व अध्ययन, अध्यापन अहवाल देणे, सरल अपडेट करणे, स्कूल मास्टर या गोष्टी शिक्षकांना शासनाला पुरवाव्या लागत आहेत.

शासनाबरोबर विविध मोठ्या शैक्षणिक संस्था जसे मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेसारख्या शैक्षणिक गुणवत्ता जोपासणाऱ्या संस्थाही आपापल्या पातळीवरून शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांच्या ऑनलाइन कार्यशाळा वारंवार घेऊन विविध उपक्रमांद्वारे शिक्षण प्रबोधनाचे कार्यही या लॉकडाऊनच्या शाळा बंद काळात सुरू आहे.

कोरोना संकटात शाळा बंद काळातील शिक्षण मोबाइल शिक्षण सुरू असले तरी पालकांना मोबाइल, तसेच डाटा खर्च खिशाला परवडणारा नाही. प्रत्येक शिक्षक आपापल्या परीने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांबरोबर संपर्क साधून शिक्षण प्रवाहात सामील करतो आहे. मात्र, वेगवेगळ्या मोबाइल, शैक्षणिक माध्यमे (यू ट्यूब, ॲप) सारख्यांचा अतिरेक होतो की काय, असे दिसते आहे. मोबाइलचा अतिवापर पालकांची डोकेदुखी होत आहे, अशी पालकांमध्ये प्रतिक्रिया असून, विविध ॲप आवरा, शिक्षण सावरा अशी काहीशी भावना ग्रामीण भागात व्यक्त होत आहे. गोंधळलेले पालक-भांबावलेले विद्यार्थी, विविध आदेशाचे पालन करणारे शिक्षक असे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे.

------------------------

ग्रामीण भागामध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम, अशिक्षित पालक यामुळे मोबाइल हाताळणे जिकिरीचे होते. तसेच किमतीचा विचार केल्यास ग्रामीण भागामध्ये उत्पन्नाचा स्रोत कमी असल्यामुळे न परवडणारे आहे. या समस्या विद्यार्थ्यांसमोर असून त्यासाठी शाळा हीच काळाची गरज असून, बहुतांश पालकांकडे स्मार्ट मोबाइल नाही, त्यामुळे मुले वंचित राहतात.

- भीमराज शिंदे, पालक, जळगाव नेऊर.