शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

शिक्षणाचा उपयोग उद्योगात व्हावा :  शरयू देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:01 IST

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एस.एम.आर.के. माहिला महाविद्यालयात आयोजित सृजन या शैक्षणिक प्रदर्शनाचे उद्घाटन शरयू देशमुख यांच्या हस्ते झाले. देशमुख पुढे म्हणाल्या की, शिक्षणाचा उपयोग करून स्वत:चे उद्योगविश्व तयार करा. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सशक्त माध्यम आहे व आपल्या शिक्षणाचा समाजासाठी अधिकाधिक उपयोग करा, असे आवाहन त्यांनी केले.

नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एस.एम.आर.के. माहिला महाविद्यालयात आयोजित सृजन या शैक्षणिक प्रदर्शनाचे उद्घाटन शरयू देशमुख यांच्या हस्ते झाले. देशमुख पुढे म्हणाल्या की, शिक्षणाचा उपयोग करून स्वत:चे उद्योगविश्व तयार करा. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सशक्त माध्यम आहे व आपल्या शिक्षणाचा समाजासाठी अधिकाधिक उपयोग करा, असे आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्य दीप्ती देशपांडे, उपप्राचार्य साधना देशमुख, डॉ. कविता पाटील, डॉ.नीलम बोकील व्यासपीठावर उपस्थित होत्या. या प्रदर्शनात महाविद्यालयाच्या प्रत्येक विभागाने विविध प्रतिकृती, तक्ते, भित्तीपत्रे ठेवली आहेत. मराठी विभागाने पुस्तकांचे गाव साकारले आहे. हिंदी विभागाने हिंदी साहित्यकृतींचा परिचय करून दिला आहे. गृहविज्ञान शाखेने वस्त्रप्रावरण कला, तसेच आहारशास्त्र विषयाद्वारे आहाराच्या बदलत्या संकल्पना, महिला आहारतज्ज्ञांचे योगदान स्पष्ट केले आहे.  संगीत विभागाद्वारे माहिला गायिकांची शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील कामगिरी ध्वनिमुद्रणाच्या माध्यमातून दाखविली आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी खुले आहे, असे प्राचार्यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकWomenमहिला