शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण क्षेत्रातील मार्गदर्शक हरपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:32 IST

मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माजी मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक नारायणराव पवार यांच्या निधनाने या क्षेत्रातील त्यागी व मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देमान्यवरांची शोकभावना : नारायणराव पवार यांना श्रद्धांजली

नाशिक : मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माजी मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक नारायणराव पवार यांच्या निधनाने या क्षेत्रातील त्यागी व मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.नारायणराव पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात शोकसभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव म्हणाल्या की, पवार यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विद्यार्थी घडविले. शिक्षण क्षेत्रात त्यांचे कार्य सर्वांना प्रेरणा देत राहील. मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार यांनी सांगितले की, नारायणराव पवार यांनी मविप्र संस्थेचा नावलौकिक वाढविण्याचे मोलाचे कार्य केले. त्यांचे कार्य विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक आणि अन्य मुख्याध्यापकांसाठी दीपस्तंभाप्रमाणे आहे. आमदार डॉ. सुधीर तांबे आपल्या शोकभावना व्यक्त करताना म्हणाले की, पवार यांचे जीवन त्यागी, निरपेक्ष आणि मंगलमय होते. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम केले आहे. याप्रसंगी कादवाचे संचालक बाळासाहेब जाधव, ग्रामोदय शिक्षण संस्थेचे मुन्ना हिरे, मविप्रचे माजी शिक्षणाधिकारी आर. एस. अहेर, प्रा. डॉ. यशवंत पाटील, शिरीष सावंत, गौतम सुराणा, यतिंद्र घुगे, भगीरथ शिंदे आदींसह मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी माणिकराव कोकाटे, माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी उपमहापौर अजय बोरस्ते, रवींद्र पगार, अमृता पवार, अ‍ॅड. नितीन ठाकरे आदींसह राजकीय व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र