शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देशमानेकरांची आर्थिक फसवणूक

By admin | Updated: January 17, 2017 01:23 IST

आॅनलाइन नोंदणी : घरे, इमारतींच्या नोंदणीसाठी पैशांची मागणी; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

येवला : तालुक्यातील देशमाने खुर्द व बुद्रूक येथील घरे, इमारती, कृषक, अकृषक यांची आॅनलाइन नोंदणीच्या नावाखाली होत असलेली आर्थिक फसवणूक थांबवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप दुघड यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे.  देशमाने बुद्रूक व खुर्द या गावात अहमदनगर येथील संस्थेमार्फत ग्रामपंचायत हद्दीत व अंतर्गत असणाऱ्या मालमत्ता कर आकारणीसाठी सर्व्हे करण्यात येत असून, हा सर्व्हे करणाऱ्यांकडून कर आकाराणीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली जात आहे. ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या मालमत्ता कर आकारण्याचा अधिकार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८च्या कलम ४ नुसार ग्रामपंचायतीला असतानादेखील वैयक्तिक पातळीवर, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याशी संगनमताने कराच्या पावत्या छापून प्रत्येक घर, इमारत, बखळ जागा, कृषक, अकृषक जागा आॅनलाइन मोजणी नोंदवून प्रत्येकी १०० रुपये जमा करण्याचा सपाटा लावला असून, फेररिव्हिजन पावतीवर सामान्य पावती नमुना नं ८, घर नंबर, दिनांक, गट नंबर, मालमत्ताधारकाचे नाव, तर पुढील प्रमाणे कर आकारणी करण्यात आलेली आहे. यामध्ये मेहनताना कर ४० रु पये, नोंद कर ४० रु पये, आकारणी कर ३० रु पये प्रमाणे अनधिकृतपणे रक्कम जमा केली जात असून, यात शासनाला कुठलाही कर भरला जात नाही. याबाबत देशमाने येथील नागरिकांनी गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता हा सर्व्हे शासनाच्या निर्णयावरून होत असल्याचे सांगितले होते. मात्र जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड यांच्याशी संपर्क साधून या प्रकाराबाबत चौकशी केली असता त्यांनी तत्काळ याच्याशी प्रशासनाचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगितले आहे.  देशमाने बुद्रूक व खुर्द या गावातील घरांची संख्या, बखळ जागा, कृषक, अकृषक सर्व मिळून दोन हजार पावत्या नागरिकांना वाटण्यात आल्या असून, गावातून एकूण दोन लाख रु पयांची रक्कम जमा केली आहे. . (वार्ताहर)