शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाणावलेले डोळे अन् गळाभेट दहावीची परीक्षा : आठवले पहिलीपासूनचे शाळेचे दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:57 IST

नाशिक : गेल्या १ मार्चपासून सुरू झालेली इयत्ता दहावीची परीक्षा गुरुवार, दि. २२ रोजी संपली आणि विद्यार्थ्यांनी ऐकमेकांची गळाभेट घेत आनंद व्यक्त केला,

ठळक मुद्देविद्यार्थी जुन्या आठवणीत रमताना काहीसे भावूकपरीक्षा विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठीही तितकीच महत्त्वाची शिक्षकांपुढे झुकले आणि चरणस्पर्श करीत निरोप घेतला

नाशिक : गेल्या १ मार्चपासून सुरू झालेली इयत्ता दहावीची परीक्षा गुरुवार, दि. २२ रोजी संपली आणि विद्यार्थ्यांनी ऐकमेकांची गळाभेट घेत आनंद व्यक्त केला, तर काही विद्यार्थिनींचे डोळे पाणावले. शाळेत पहिले पाऊल ठेवल्यापासूनचे दिवस आठवत विद्यार्थी जुन्या आठवणीत रमताना काहीसे भावूक झाले. पालकांनाही आपले अश्रू लपवता आले नाही. विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाला कलाटणी देणारी दहावीची परीक्षा विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठीही तितकीच महत्त्वाची असते. गुरुवारी दहावीचा अखेरचा पेपर संपला आणि विद्यार्थ्यांनी एकमेकांना निकालासाठी आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. एकीकडे दहावीची परीक्षा सुरळीत पार पडल्याचा आनंद असताना दुसरीकडे शालेय आयुष्याचा उंबरठा ओलांडल्याचे दु:खदेखील व्यक्त करण्यात आले. विशेषत: पालक अधिक भावुक झाले होते. डोळ्यासमोर पहिलीत घातलेली मुले आज दहावीची परीक्षा देऊन बाहेर पडल्याने त्यांच्यासमोर आपल्या पाल्याचा शालेय जीवनातील पटच उभा राहिला. शहरातील अनेक परीक्षा केंद्रांवर शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आले होते. परीक्षा संपून विद्यार्थी बाहेर येताच विद्यार्थी शिक्षकांपुढे झुकले आणि चरणस्पर्श करीत त्यांचा निरोप घेतला. या भावुकप्रसंगी अनेक शिक्षिकांचे डोळेदेखील पाणावले, तर शाळेतील अनेक मैत्रिणींनी साश्रू नयनांनी एकमेकींना निरोप दिला. निरोपाचा हा भावनिक खेळ एकीकडे सुरू असताना जवळच्याच स्नॅक्स, ज्युस दुकानांसमोर छोटेखानी पार्टी करून काहींनी आनंदोत्सवदेखील साजरा केला. परीक्षा केंद्रातून विद्यार्थी बाहेर आल्यानंतर शाळेच्या आवारातच परीक्षेचा अखेरच्या दिवशी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आनंद व्यक्त करीत एकमेकांचे अभिनंदन केले. पालकही मोठ्या संख्येने परीक्षा केंद्राबाहेर उभे होते. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचीही इतर पालकांबरोबर यापुढे भेट होणार की नाही म्हणून तेही एकमेकांना पुन्हा भेटण्याचे आश्वासन देत हस्तांदोलन करीत गळाभेट घेत होते. शाळेच्या आवारात अशाप्रकारचा स्नेहसोहळा अनेक ठिकाणी दिसून आला. परीक्षेनंतरही बराच वेळ गर्दी असल्याने काही शाळांना ध्वनिक्षेपकावर शाळेचे आवार सोडण्याचे आवाहन करावे लागले.