शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 02:07 IST

पालघर तलासरी परिसरात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवत असून, गुरुवारी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत सर्वाधिक तीन रिश्टर स्केलपर्यंतचे धक्के जाणवल्याची नाशिकच्या भूकंपमापन केंद्रात नोंद झाली आहे.

नाशिक : पालघर तलासरी परिसरात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवत असून, गुरुवारी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत सर्वाधिक तीन रिश्टर स्केलपर्यंतचे धक्के जाणवल्याची नाशिकच्याभूकंपमापन केंद्रात नोंद झाली आहे.गुरुवारी उत्तर रात्री आणि शुक्रवारी सकाळ या दरम्यान ३.३०, ३.५८ आणि ७.०६ मिनिटांनी सरासरी तीन आणि त्यापेक्षा अधिक तीव्र धक्क्यांची नोंद झाली आहे. पालघर आणि तलासरीच्या टप्प्यात भूकंपाचा केंद्र बिंदू होता अशी माहिती नाशिकच्या मेरी (महाराष्टÑ इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) येथील भूकंपमापन केंद्राच्या सूत्रांनी दिली. सध्या पालघर परिसरात भूकंपाचे धक्के बसत आहेत. मात्र नाशिकमध्येच भूकंप झाल्याची चर्चा होत असली तरी नाशिकमध्ये मात्र कुठेही भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद नाही.यापूर्वी गेल्या शनिवारी (दि.५) मध्यरात्री नाशिकपासून ९५ किलोमीटर अंतरावर रात्री बारा वाजेच्या सुमारास भूगर्भात हालचाली झाल्याच्या जाणवल्या. त्यामुळे ३.६ रिश्टर स्केलचे धक्के नोंदवले गेले होते. केंद्रबिंदू जमिनीच्या पाच किलोमीटर खाली असल्याचे आढळले होते. पेठ, कळवण तालुक्यातील दळवट या ठिकाणी सौम्य धक्के जाणवत असतात.त्यामुळे सध्या पालघराला भूकंप झाला की नाशिकला धक्के बसल्याची चर्चा होत असते. मात्र त्यात तथ्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकpalgharपालघरEarthquakeभूकंप