दिंडोरी : तालुक्यातील उमराळे बु. येथे रविवारी पहाटे ३ वाजता काही सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. २.७ रिश्टर स्केल इतकी या धक्क्यांची तीव्रता होती. काही महिन्यांपूर्वीही येथे भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दि. २१ जुलै रोजी मध्यरात्री १२ वा. ४० मिनिटांनी २.७ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली होती. तसेच आॅगस्टमध्ये ९.३० ते ९.५० च्या दरम्यान १.७ रिश्टर स्केलची नोंद झाली असून, असे हादरे अधूनमधून बसत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शासनाने या ठिकाणी भूकंप मोजमाप यंत्रसामग्री बसवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तीन ते चार महिन्यांपासून हे धक्के बसत असून, विशेषत: ते मध्यरात्री किंवा पहाटेच बसत असल्याने येथील नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत.
उमराळेला रविवारी पहाटे जाणवले भूकंपाचे धक्के
By admin | Updated: September 1, 2015 22:14 IST