नाशिक : महापालिकेच्या पाणीपट्टी आणि घरपट्टी विभागाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसले तरी यंदा दोन्ही कर वसुलीत लक्षणीय वाढ झाली आहे. ३१ मार्च म्हणजे आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशीच महापालिकेला सुमारे सव्वा कोटी रुपये मिळाले आहेत. दरम्यान, आता घरपट्टी थकबाकीदारांच्या मिळकती जप्त करून त्यांचे लिलाव करण्याची कार्यवाही याच महिन्यात करण्यात येणार आहे.महापालिकेच्या दृष्टीने घरपट्टी यंदाच्या वर्षी सर्वाधिक महत्त्वाचा विषय होता. महापालिकेने २०१७-१८ या आर्थिक वर्षात घरपट्टीतून ९५ कोटी रुपये वसुल केले होते. परंतु महापालिकेच्या तीस वर्षांच्या इतिहासात प्रथमच शंभर कोटीवर वसुलीचा आकडा पार झाला आहे. सरलेल्या आर्थिक वर्षात महापालिकेला २५६ कोटी रुपयांचे कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु नंतर करवाढीस झालेला विरोध बघता ते शंभर कोटी रुपयांनी घटविण्यात आले होते. तितकी रक्कम वसूल करण्यात यश आले नाही.नगररचना विभागाकडे विकास शुल्क आणि अन्य शुल्कांच्या माध्यमातून १०२ कोटी रुपये वर्षभरात मिळाले आहेत. तरीही या विभागाला अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही. या विभागाला सुमारे अडीचशे कोटींचे उद्दिष्ट होते.
एका दिवसात पालिकेला सव्वा कोटीची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 01:18 IST
: महापालिकेच्या पाणीपट्टी आणि घरपट्टी विभागाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसले तरी यंदा दोन्ही कर वसुलीत लक्षणीय वाढ झाली आहे. ३१ मार्च म्हणजे आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशीच महापालिकेला सुमारे सव्वा कोटी रुपये मिळाले आहेत.
एका दिवसात पालिकेला सव्वा कोटीची कमाई
ठळक मुद्देमार्चअखेर : आता मिळकतींचे लिलाव