शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

श्राद्धकर्माच्या पितृपंधरवड्यास प्रारंभ

By admin | Updated: September 28, 2015 23:34 IST

श्राद्धकर्माच्या पितृपंधरवड्यास प्रारंभ

नाशिक : दिवंगत झालेल्या पूर्वज-पितरांचे स्मरण करून देणाऱ्या आणि श्राद्धकर्माच्या माध्यमातून पितरांना आवाहन करत त्यांचे कृपाशीर्वाद प्राप्त करून घेणाऱ्या पितृपंधरवड्यास आजपासून (दि.२८) प्रारंभ झाला. दि. १२ आॅक्टोबरपर्यंत घरोघरी श्राद्धविधी चालणार असून, पितृपक्षात कोणतेही शुभ कार्य केले जात नसल्याने बाजारपेठेतील उलाढालही मंदावणार आहे. दरम्यान, सिंहस्थ कुंभपर्वकाळातही श्राद्धविधी करण्यात कोणतीही अडचण नसल्याचा निर्वाळा शास्त्र अभ्यासकांनी दिला आहे. सोमवार, दि. २८ सप्टेंबरपासून भाद्रपद कृष्ण प्रतिपदेस महालयारंभ अर्थात पितृपक्षास प्रारंभ झाला आहे. हिंदू धर्मात पितृपक्षात दिवंगत पितरांचे श्राद्धकर्म केले जाते. घरातील व्यक्ती ज्या तिथीला दिवंगत झाली असेल त्या तिथीला त्यांच्या नावाने श्राद्धविधी करण्याची प्रथा-परंपरा चालत आलेली आहे. याशिवाय तर्पणविधी, पिंडदानादि विधीही केले जातात. यंदा पितृपंधरवड्यात ३० सप्टेंबरला भरणीश्राद्ध असून, ६ आॅक्टोबरला अविधवा नवमी आहे. तसेच दि. ८ आॅक्टोबरला एकादशी श्राद्ध आहे. दि. ११ आॅक्टोबरला शस्त्रादीहत् पितृश्राद्ध आहे. दि. १२ आॅक्टोबरला सर्वपित्री अमावस्येने पितृपंधरवड्याची सांगता होईल. याचदिवशी सोमवती अमावस्याही असल्याने अमावस्या श्राद्धकर्म होईल. ज्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तींची मृत्यूची तिथी माहिती नसेल अथवा तिथी माहिती असूनही काही कारणास्तव त्या तिथीला श्राद्धविधी करता आला नसेल त्यासाठी सर्वपित्री अमावस्येला श्राद्धकर्म पार पाडावे, असे धर्मशास्त्राचे संकेत आहेत.