शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाच्या आगमनाची आतुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 00:14 IST

दिंडोरी/लखमापूर : दिंडोरी तालुक्यात गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली असून, कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी आपापल्या घरीच बाप्पाला विराजमान करण्यास पसंती दिली आहे.

ठळक मुद्देतादुकाने सजली : विविध आकाराच्या मूर्र्ती बाजारात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी/लखमापूर : दिंडोरी तालुक्यात गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली असून, कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी आपापल्या घरीच बाप्पाला विराजमान करण्यास पसंती दिली आहे.यंदा कोरोना संसर्ग असल्यामुळे कुठलाही गाजावाजा न करता अगदी साध्या पद्धतीने गणपती बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता लखमापूर व परिसरात लागली आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी कोरोनाचे शासकीय नियम पाळून विविध मंडळे सज्ज झाली आहेत. विविध ठिकाणी फिजिकल डिस्टन्स्ािंगचे नियम पाळून जागोजागी वेगवेगळ्या आकाराच्या बाप्पाच्या मूर्तीची दुकाने सजली आहेत.सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी जनतेचा कौल वाढला आहे. महाराष्टÑाचे आराध्यदैवत व विघ्नहर्ता गणपतीबाप्पाच्या आगमनाची तयारी म्हणजे सध्या संपूर्ण देशात व विविध प्रांतात कोरोनाने आपले रौद्र रूप धारण केले आहे.सजावट साहित्याची वाढती मागणीबाप्पा विराजमान करून कोरोनाचे हे संकट जाईल, अशी प्रार्थना करून अनेक मंडळे त्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. ही भावना मनात ठेवून बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली आहे. यंदा बाप्पाचे आगमन कुठलाही गाजावाजा न करता, कुठलीही मिरवणूक नाही. अगदी साध्या पद्धतीने करण्यावर प्रत्येक मंडळाने भर दिला आहे. यामुळे येत्या गणपती बाप्पाच्या स्थापनेपासूनच सामाजिक बांधिलकीची जाणीव कशी चांगल्या प्रकारे जोपासली यावर अनेकांचा भर आहे.यंदा गणेश उत्सवावर अनेक बंधने आहेत. मोठ्या आकाराची मूर्ती नको, कुठलाही प्रकारचा गाजावाजा नाही. सोशल डिस्टन्सचे नियम असे अनेक नियम असल्यामुळे बºयाच नागरिकांनी आपापल्या घरीच बाप्पा विराजमान करण्याला पसंती दिली आहे.यंदा कोरोनाचे वातावरण व्यापक असल्यामुळे आम्ही कुठलाही गाजावाजा न करता व शासकीय नियम पाळून दोन वेळेस आरती, प्रसाद करून तसेच कोरोनाविषयी जनजागृती, आरोग्य जनजागृती आदी मोठ्या प्रमाणावर भर देणार असल्याची प्रतिक्रिया गणेश भक्त मंडळांनी दिली आहे.सध्या कोरोनामुळे सार्वजनिक मंडळांकडून स्थापना थोड्याफार प्रमाणात करण्यात येणार आहे.

टॅग्स :ganpatiगणपतीNashikनाशिक