शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

दिंडोरी तालुक्यात ४३६२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची ई-पीक नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 16:41 IST

दिंडोरी : राज्यातील ई-पीक पाहणीचा पथदर्शी प्रकल्प दिंडोरी तालुक्यात राबविण्यात येत असून, जुलैअखेरपर्यंत ३६१९ शेतकऱ्यांच्या ४३६२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची ई-पीक नोंदणी झाली असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार यांनी दिली.

ठळक मुद्दे पिकाचा फोटो अपलोड करायचा आहे. ही नोंद तलाठीला आॅनलाइन दिसणार

दिंडोरी : राज्यातील ई-पीक पाहणीचा पथदर्शी प्रकल्प दिंडोरी तालुक्यात राबविण्यात येत असून, जुलैअखेरपर्यंत ३६१९ शेतकऱ्यांच्या ४३६२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची ई-पीक नोंदणी झाली असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार यांनी दिली.नाशिक विभागातून दिंडोरी तालुक्याची ई-पीक पाहणी नोंदणीसाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून निवड झालेली आहे. तालुक्यात हा प्रकल्प फेब्रुवारी २०१९ पासून राबवण्यात येत आहे. तालुक्यात एकूण ६७,०६४ पैकी ५६,४२६ खातेदारांची आतापर्यंत प्राथमिक नोंदणी झालेली आहे. तालुक्यातील सर्व तलाठी व कृषी सहायक तसेच जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण नुकतेच पार पडले. राज्यस्तरावरून या प्रकल्पाचे प्रमुख मार्गदर्शक व राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ. जयंतकुमार बांठीया, संभाजी कडू पाटील, प्रकल्प सल्लागार रामदास जगताप, राज्य समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे यांनी मार्गदर्शन केले. दिंडोरी तालुक्याचे ई-पीक पाहणी कामकाजाचे सूक्ष्म नियोजन करण्यासाठी अधिकाºयांसमवेत आढावा बैठक पार पडली. दिंडोरी तालुक्यातील पोलीसपाटील, कोलवाल, कृषिमित्र, मोबाइलदूत, स्वस्त धान्य दुकानदार, ई-सेतु केंद्रधारक व शेतकरी गटांनाही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोबाइल अ‍ॅपवर पीक-पाहणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. चालू वर्षाच्या खरीप हंगामातील पीक पाहणीला सुरुवात झाली असून, या वर्षीच्या खरीप हंगामातील संपूर्ण पीक पाहणी ही फक्त मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून केली जाणार असल्याने सर्व शेतकºयांनी आपल्या पिकांची नोंदणी स्वत: करणे आवश्यक आहे, असे कळविण्यात आले आहे.ई-पीक नोंदणीप्रक्रि याशेतकºयांनी मोबाइलवर ई-पीक पाहणी अ‍ॅपद्वारे आपल्या पिकांची नोंदणी करावयाची असून, आपल्या पिकाचा फोटो अपलोड करायचा आहे. ही नोंद तलाठीला आॅनलाइन दिसणार असून, त्यांनी मान्यता देताच सातबारा उताºयावर आॅनलाइन नोंद होणार आहे.ई-पीक नोंदणीचे फायदेआॅनलाइन नोंदणीमुळे अचूक व गतीने माहिती संकलित होणार आहे. या माहितीचा उपयोग शासनाला कृषी धोरण आखताना होणार असून, पीककर्ज, पीकविमा कर्जमाफी, नैसर्गिक आपत्तीचे नियोजन, शासकीय खरेदी केंद्रावर शेतमाल खरेदी-विक्र ी करणे या कामकाजात सुलभता आणण्यास व तलाठी यांच्याकडील कामाचा बोजा कमी करण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीGovernmentसरकार