शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात लवकरच धावणार ई बसेस

By suyog.joshi | Updated: February 12, 2024 20:50 IST

बस डेपो परिसरात वीज उपकेंद्र उभारणीसाठी 14 कोटी खर्च येईल.

नाशिक (सुयोग जोशी) : शहरात प्रदुषणाला आळा घालावा म्हणून केंद्र शासनाच्या एन कॅप निधीअंतर्गत १४ कोटी रूपये खर्च करून महापालिका आता सबस्टेशन उभारणार असून लवकर ई बसेस धावू लागणार आहेत. केंद्र सरकार बससेवा सुरु झाल्यानंतर पुढील दहा वर्षासाठी एका बससाठी प्रतिकिलोमीटर २४ रुपये अनुदान मिळणार आहे. केंद्र सरकार 'स्वच्छ हवा' कार्यक्रमाअंतर्गत वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकांना दरवर्षी कोट्यवधीचा निधी देत आहे. त्या अंतर्गत नाशिक मनपाला मागील चार वर्षात ऐंशी कोटी निधी प्राप्त झाला आहे. या निधीचा वापर मनपा इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी करणार होती. परंतु काही कारणास्तव त्यावर पाणी फिरले. आता केंद्राच्या पीएमई बस योजनेअंतर्गत नाशिक मनपाला पन्नास इलेक्ट्रिक बसेस मिळणार आहे. त्यासाठी मनपा एन कॅप निधीतून आडगाव ट्रक टर्मिनल येथे बसेससाठी इलेक्ट्रिक बस डेपो उभारणार आहे. केद्रांचा पथकाने या डेपोची पाहणी केली आहे. इलेक्ट्रिक बसेस चार्जिंगसाठी महावितरणचे सबस्टेशन उभारावे लागणार आहे. त्यासाठी मनपाने महावितरणकडे कोटेशन मागितले होते. त्यानुसार बस डेपो परिसरात वीज उपकेंद्र उभारणीसाठी चौदा कोटी खर्च येईल. महावितरणला कार्यारंभ आदेशमनपाने लवकरच त्यासाठी महावितरणला कार्यारंभ आदेश देणार आहे. या ठिकाणी चार्जिग स्टेशन पाॅइट उभारणे, तिथ पर्यंत केबल टाकणे याचा देखील समावेश आहे. महापालिकेकडून सिटिलिंक बससेवा सुरु असून त्यासाठी ठेकेदार मनपाने नेमला आहे. पण, पन्नास ई बसेससाठी केंद्र सरकार एजन्सी नेमेल व त्याच्याकडून शहरात बससेवा कार्यन्वित केली जाईल. सबस्टेशन उभारण्याबरोबरच दर महिन्याचे चार्जिंगचे बील हे एजन्सीकडून दिले जाणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक