शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

‘द्वारकाधीश’चे सर्वाधिक गाळप

By admin | Updated: April 3, 2016 23:17 IST

शेवरे : साखर कारखान्याने दिला २०२५ रु पये भाव

 सटाणा : बागलाण तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखान्याने यंदा उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक चार लाख ५८ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून पाच लाख दोन हजार क्विंटल साखरचे उत्पादन घेतले असून, यंदाच्या गळीत हंगामात प्रतिटन १८५० रुपये पहिले पेमेंट अदा केले आहे. एफआरपीनुसार एकूण २०२० रुपये पेमेंट होत असले तरी कारखान्याकडून ऊस उत्पादकांना प्रोत्साहन म्हणून २०२५ रुपये भाव देण्यात येईल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी दिली.शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची आवारातील द्वारकाधीश मंदिरात शेवटच्या साखर पोत्याचे पूजन करून सांगता करण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत, मविप्रचे माजी संचालक नारायण कोर, शेतकरी के.पी. जाधव, काशीनाथ नंदन, सुभाष कांकरिया, बेबीबाई नंदन, रामदास नंदन, मोहनाबाई सूर्यवंशी, धनलाल सूर्यवंशी यांच्या हस्ते वैदिक पद्धतीने साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले. प्रारंभी कारखान्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी शिवाजी भालेराव यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्षेत्रात कारखान्याच्या आडसाली योजनेअंतर्गत एक हजार एकर वर उसाची लागवड करण्यात आली होती त्यातून सरासरी ६० ते ८० मेट्रिक टन उसाचे उत्पादन मिळाले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आगामी गळीत हंगामातही आडसाली योजना सुरू राहणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष सावंत यांनी जाहीर केले. कारखान्याच्या धोरणानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून वाटचाल केल्याचे फलित म्हणून मात्र काही कारखाने हा कायदा पायदळी तुडवून शेतकऱ्यांवर अन्याय करते एफआरपीनुसार एकूण पेमेंट २०२० रुपये होते; मात्र कारखान्याने दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून प्रतिटनामागे पाच रुपये जास्त देण्यात येतील, असेही यावेळी अध्यक्ष सावंत यांनी जाहीर केले. या प्रसंगी सुधाकर पाटील, पंकज दुसाने, विनायक चिंचोरे, देवीदास अहिरराव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्र मास जिल्हा बँकेचे माजी संचालक यशवंतबापू अहिरे, मोठाभाऊ बोरसे, नथू पवार, बाबाजी भामरे, भटू नंदन, शंकर साळुंखे, बन्सीलाल बत्तीसे, रघुनाथ निकम, मधुकर काचवे, एम.ए. पटेल, विजय पगार, रामदास घोडके, गोपीनाथ शेलार, सतीश सोनवणे, राजू धोंडगे यांच्यासह निफाड, शिरपूर, साक्री, कळवण, नांदगाव, नवापूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. कारखान्याचे ऊस विकास अधिकारी परेश साखरे यांनी आभार मानले. (वार्ताहर)