शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

भगूर बसस्थानकात प्रवाशांना धुळीचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 00:41 IST

भगूर बसस्थानकाच्या नूतनीकरणामुळे स्थानकाशेजारील मोकळ्या भूखंडावर स्थलांतरित झालेल्या बसस्थानकातील धुळीचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहेच, शिवाय महामंडळाने अन्य कोणतीही सुविधा उपलब्ध करून न दिल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

भगूर : भगूर बसस्थानकाच्या नूतनीकरणामुळे स्थानकाशेजारील मोकळ्या भूखंडावर स्थलांतरित झालेल्या बसस्थानकातील धुळीचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहेच, शिवाय महामंडळाने अन्य कोणतीही सुविधा उपलब्ध करून न दिल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.भगूरसह आजूबाजूच्या खेड्यापाड्यांसाठी भगूर बसस्थानक अत्यंत महत्त्वाचे असल्याने या स्थानकातून शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक केली जाते. सध्या या स्थानकाचे नूतनीकरण सुरू असल्याने जवळच मोकळ्या भूखंडावर येथील सर्व प्रवासी वाहतूक स्थलांतरित करण्यात आलेली आहे. मात्र तेथे बस प्रवाशांना कुठल्याही अत्यावश्यक सुविधा पुरविल्या नसल्याने उन्हातान्हाचा प्रवाशांना त्रास होत असल्याने प्रवासी वर्गात मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.स्थानकाच्या कामकाजामुळे जवळच्याच मोकळ्या मैदानात तात्पुरती बस वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात आली असली तरी त्यामुळे प्रवाशांची गैरसोयच अधिक झाली आहे.या ठिकाणी बसण्याची व्यवस्था तर नाहीच, शिवाय प्रवासी निवाराशेड, पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृह अशी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने तीव्र नाराजी आहे. निवाराशेड नसल्यामुळे प्रवाशांना रणरणत्या उन्हात ताटळत उभे रहावे लागत आहे. शाळेचे विद्यार्थी, वयोवृद्ध ताटकळत बसची वाट पाहत उभे राहतात.ग्रामीण भागातील सर्वांत मोठे बसस्थानक म्हणून भगूर स्थानकाचा उल्लेख होतो. या बसस्थानकातून बार्नस्कूल, लहवित, साउथ, वंजारवाडी, साकुर, कवडधरा, धामनगाव, घोटी, इगतपुरी तसेच राहुरी, विंचुरी, पांढुर्ली, शिवडा, घोरवड, कोनांबे, सिन्नर तसेच भगूर, देवलाली, नाशिकरोड, द्वारका, नाशिक, शालिमार, सीबीएस, पंचवटी, भगूर- पुणे, भगूर-पेठ आदी ठिकाणी बसेस धावतात. त्यामुळे बस डेपोला लाखोंचे उत्पन्न मिळते. तरीही परिवहन मंडळाचे प्रवाशांकडे लक्ष नाही. भगूर परिसरातील नागरिकांनी परिवहन मंडळाकडे अनेक तक्र ारी करूनही दखल घेतली जात नाही.  राज्य परिवहन महामंडळाने तात्पुरते शेड बांधून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवासी विजय सोनवणे, रमेश कांबळे, नरेश जगताप, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिलांनी केली आहे.एका झाडाचा निवाराया विस्तीर्ण मोकळ्या भूखंडावर एकमेव झाड असून, ते फार दाट नाही. या झाडाच्या सावलीत प्रवाशांना उभे रहावे लागते, तर अन्य प्रवाशांना रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाचा आसरा घ्यावा लागतो. बस आली की धावत जाऊन पकडावी लागते. अनेक प्रवासी जवळपासचे दुकान, रसवंतीचा आसरा घेऊन उभे असतात.

टॅग्स :Nashikनाशिक