शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कडक उन्हामुळे नाशकातील रस्ते ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:28 IST

शहरात कडक उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असून, नागरिकांना सकाळपासूनच उकाड्याचा सामना करावा  लागत आहे. दुपारी १२ वाजेनंतर उन्हाच्या झळा अधिकच तीव्र  होत असल्याने पंचवटीतील  मुख्य वाहतूक रस्त्यावर वाहतूक मंदावत असल्याने रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे चित्र दिसून येत  आहे.

पंचवटी : शहरात कडक उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असून, नागरिकांना सकाळपासूनच उकाड्याचा सामना करावा  लागत आहे. दुपारी १२ वाजेनंतर उन्हाच्या झळा अधिकच तीव्र  होत असल्याने पंचवटीतील  मुख्य वाहतूक रस्त्यावर वाहतूक मंदावत असल्याने रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे चित्र दिसून येत  आहे. एरव्ही दिवसभर वाहनांच्या वर्दळीने फुलणारे रस्ते उन्हामुळे ओस पडत असल्याने मुख्य रस्त्यावर काहीकाळ शुकशुकाट पसरत आहे.  नागरिकही घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करीत आहेत, तर ग्राहकांची वर्दळ कमी झाल्याने बाजारपेठेत दुपारच्या वेळी शांतता दिसत आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत कडक हातगाडीधारक, फेरीवालेदेखील झाडाच्या सावलीचा आधार घेत असल्याचे दिसून येते.उसाच्या रसाला मागणीउन्हाळ्यात उसाच्या रसाला मागणी असल्याने ठिकठिकाणी रसवंतीच्या गाड्या रस्त्यावर फिरताना दिसत आहेत तर बसस्थानकाबाहेर रसवंतीगृह तसेच लिंबूपाणी, आइस्क्र ीम विक्रेते, बर्फ गोळा, सरबत विक्र ीची दुकाने थाटण्यास प्रारंभ झाला आहे. कामानिमित्ताने घराबाहेर पडणारे नागरिक विशेषत: ज्येष्ठ नागरिक डोक्यावर छत्री किंवा हॅट परिधान करून उन्हापासून बचाव करत असल्याचे दिसून येत आहे. बाजारात द्राक्षांबरोबरच कलिंगड, खरबुज, आंब्याचेही आगमन झाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक