शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवरात्री दिवशीही त्र्यंबकेश्वर देवस्थान कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, अनेक कार्यक्रम रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 10:02 IST

प्रोटोकॉल वगळता व्हीआयपी दर्शन सेवा बंद. बचत गट पुरोहित संघ व तुंगार ट्रस्टची मदत

बकेश्वर : वेतनवाढीच्या मागणीसाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे महाशिवरात्रीस होणारे जादाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. दरम्यान, देवस्थान ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वेगळे नियोजन करावे लागले आहे. सध्या तुंगार मंडळी ट्रस्टचे कर्मचारी, बचत गटांच्या महिला, काही सेवाभावी युवक, पुरोहित संघाचे कार्यकर्ते याशिवाय स्वतः विश्वस्त मंडळाचे सदस्य गर्दीचे नियोजन उभे राहुन करत आहेत. 

महाशिवरात्री हा दिवस ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर देवस्थानचा मुख्य दिवस असतो. इतर सणा वारांपेक्षा महाशिवरात्रीला येथे जादा महत्व आहे. महामृत्युंजय भगवान शिवाचे येथे अधिष्ठान आहे. हे ज्योतिर्लिंग स्वयंभु ज्योतिर्लिंग आहे. येथे पिंडीवर शाळुंका ऐवजी अंगठ्याच्या आकाराचे तीन पिंडीतील खळग्यामध्ये ब्रम्हा-विष्णू-महेश यांच्या प्रतिकृती म्हणुन तीन लिंगे आहेत. म्हणुन या ज्योतिर्लिंगाला इतर ज्योतिर्लिंगांपेक्षा आगळे वेगळे महत्व आहे. म्हणुनच महाशिवरात्रीस येथे विशेष महत्व आहे. 

या दिवशी दर्शन नियोजन पुढील प्रमाणे : भाविकांना दर्शन घेण्याच्या दृष्टीने मंदीराचे पुर्वेकडील गेटमधुन धर्मदर्शन भाविकांना 24 तास खुले असेल. देणगी दर्शनाच्या वेळ मंदीर उघडल्यापासून सकाळी 07.00 पासुन मंदीर बंद होईपर्यंत सुरु राहील. तथापि गर्दीनुसार देणगी, दर्शनाबाबत प्रशासन नियोजनाबाबत निर्णय घेईल. स्थानिक भाविकांना पश्चिम दरवाजाने पहाटे मंदीर उघडल्या पासुन दुपारी 12.30 पर्यंत. व सायंकाळी 6.00 वाजेपासुन ते दुसऱ्या दिवशी दि. 5 मार्चपर्यंत दुपारी 12.30 पर्यंत दर्शन घेता येईल. मात्र, ओळखपत्र बरोबर आणणे अनिवार्य आहे. तसेच सायंकाळी 6.00 पासुन मंदीर बंद होईपर्यंत प्रवेश राहील. मात्र मंदीरात जातांना आतील उत्तर दरवाजाने रांगेतुन दर्शन घ्यावे. पुरोहितांनी आपल्या यजमानांच्या धार्मिक विधीसाठी आणतांना पश्चिम (कोठीच्या) गेटने प्रवेश मिळेल. मंदीर उघडल्यापासुन सकाळी 12.30 पर्यत. महाशिवरात्रीनिमित्त भगवान त्र्यंबक राजाची पालखी दुपारी अडीच वाजता काढली जाईल. स्थानिक भाविक व बाहेरुन आलेले भाविक यांनी मंदीराबाहेर पडतांना दक्षिण दरवाजानेच (गायत्री मंदीराकडील) बाहेर पडावे. दरम्यान, महाशिवरात्री उत्सव सुलभतेने साजरा करणे व आखीव रेखीव पध्दतीने साजरा करण्यासाठी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष न्या.एम एस बोधनकर यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरMahashivratriमहाशिवरात्री