शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भगूर बसस्थानकालगत जुगारी, मद्यपींचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 01:09 IST

भगूर बसस्थानकालगत रेल्वेच्या मालकीच्या दगडीचाळीचा वापर गैरकृत्यांकरिता होत असून, सदर जागा मद्यपींचा अड्डा बनला आहे. अनेक अवैध धंदे करणारे याच परिसरात बसलेले असतात. रेल्वे व पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष न घातल्यास या परिसरात विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देअवैध धंदे : प्रेमीयुगुलांचा खुलेआम वावर; रेल्वेच्या चाळीचा गैरवापर

देवळाली कॅम्प : भगूर बसस्थानकालगत रेल्वेच्या मालकीच्या दगडीचाळीचा वापर गैरकृत्यांकरिता होत असून, सदर जागा मद्यपींचा अड्डा बनला आहे. अनेक अवैध धंदे करणारे याच परिसरात बसलेले असतात. रेल्वे व पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष न घातल्यास या परिसरात विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.भगूर बसस्थानकालगत ब्रिटिश काळापासून रेल्वे कर्मचाऱ्यांची वसाहत असून, या वसाहतीचे सर्व काम दगडात केलेले असल्याने दगडीचाळ नामकरण झालेले आहे. सध्या दगडीचाळीची दुरवस्था झाल्याने या ठिकाणी रेल्वेचे कर्मचारी राहत नाहीत. त्यामुळे दिवसभर प्रेमीयुगुल तसेच रात्री मद्यपींंसह अनेक अवैध धंदेवाल्यांनी या परिसरात ठिय्या मांडला आहे.पूर्वी रेल्वे प्रशासनाने अकरा कुटुंबे राहू शकतील, अशी इमारत उभारली होती.गेल्या दहा वर्षांत एकही कर्मचारी येथे राहण्यास न आल्याने रेल्वेच्या अकरा सदनिका ओस पडून आहेत. सदर ठिकाण बसस्थानक व रेल्वे गेट या दोन्ही परिसराला जोडणारे असून याठिकाणी प्रेमीयुगुल खुलेपणाने फिरत असतात, त्याचप्रमाणेसायंकाळनंतर दारूच्या पार्ट्यांनाही सुरुवात होते.अनेक अवैध धंदे करणारे याच परिसरातून आपली सूत्रे हलवतात. या पडीक इमारतीबद्दल स्थानिक नागरिकांनी अनेकदा रेल्वेला कळवून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. पोलीस प्रशासनाला तर या जागेचा पत्ताच नसल्याचे कळते. सध्या येथे मोठ्या प्रमाणात रिकाम्या दारूच्या, पाण्याच्या बाटल्या साचलेल्या असून, गादी, चटई व इतर वस्तू प्रत्येक घरात आढळून येत आहे. रेल्वे प्रशासनाला बांधलेल्या वास्तूचा विसर तर पडला नाही ना? असाही प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी