शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

युवती, महिलांनी स्वरक्षणासाठी दुर्गा व्हावे-आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 18:18 IST

महिला व युवतींकडे लक्ष्मी, सरस्वती म्हणून बघितले जाते. मात्र कोणी त्रास देत असेल व छळ करीत असेल तर स्वरक्षणासाठी कालीमाता व दुर्गादेवी व्हा, तुमचा आवाज तुमचे शस्त्र होऊ शकते असे प्रतिपादन शिवसेना नेते तथा युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

मालेगाव (नाशिक) : महिला व युवतींकडे लक्ष्मी, सरस्वती म्हणून बघितले जाते. मात्र कोणी त्रास देत असेल व छळ करीत असेल तर स्वरक्षणासाठी कालीमाता व दुर्गादेवी व्हा, तुमचा आवाज तुमचे शस्त्र होऊ शकते असे प्रतिपादन शिवसेना नेते तथा युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.मालेगावी शिवसेना व युवा सेनेतर्फे महाआरोग्य शिबिर, शैक्षणिक व जातीचे दाखले वाटप, महिला व युवतींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.येथील क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियममध्ये विद्यार्थिनी व महिलांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले की, बाहेर जाताना भीती वाटत असेल तर मनातील भीती घालविणे गरजेचे असते. स्वरक्षण करता आले पाहिजे, बचावाच्या वेळी तुमचा आवाज तुमचे शस्त्र होऊ शकते. तत्पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटना नंतर ठाकरे म्हणाले की, तुमच्या हातात असलेला भगवा पुढच्या वर्षी मंत्रालयावर फडकणार आहे. महाराष्टÑाच्या काना-कोपऱ्यातुन रुग्ण मुंबईत उपचारासाठी येत असतात. याची दखल घेत राज्यभर आरोग्य शिबिरे राबविण्याचा निर्णय घेतला. यावेळी ठाकरे यांचा युवासेना व शिवसेनेतर्फे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, अविष्कार भुसे, विनोद वाघ, चंद्रकांत पठाडे आदिंसह पदाधिकाºयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, युवा सेनेच्या माध्यमातुन महिलांना व युवतींना स्वरक्षणाचे धडे दिले जात आहेत. तसेच राज्यभर आरोग्य शिबिरे घेतली जात आहेत. विकासकामांचे उद्घाटन व भूमीपूजन तसेच शहर व तालुक्यातील युवकांसाठी आदित्य ठाकरे यांनी पूर्ण एक दिवस द्यावा असे साकडे भुसे यांनी घातले.युवासेने प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याहस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात जातीचे व शैक्षणिक दाखले, संजय गांधी योजनेचे मंजुरी आदेशाचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमास आमदार नरेंद्र दराडे, उदय सांगळे, बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे, उपमहापौर सखाराम घोडके, स्थायी समिती सभापती जयप्रकाश बच्छाव, शिवसेना संपर्क नेते प्रमोद शुक्ला, तालुका प्रमुख संजय दुसाने, महानगर प्रमुख रामा मिस्तरी उपस्थित होते. सूत्रसंचलन अ‍ॅड. दुसाने व प्रमोद शुक्ला यांनी केले.

टॅग्स :MalegaonमालेगांवAditya Thackreyआदित्य ठाकरे