शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या नाट्यसंमेलनात नाशिकचा वाजणार डंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 18:41 IST

‘विसर्जन’ची निवड : एकांकिकेसह ‘मुक्ती’चेही सादरीकरण

ठळक मुद्देनाटकाबरोबरच नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या एकांकिकेचेही सादरीकरण होणार आहे

नाशिक : नागपूर येथे येत्या २२ ते २४ फेबु्रवारी या कालावधीत होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनात नाशिकचा डंका वाजणार असून नाट्यसंमेलनात दत्ता पाटील लिखित ‘विसर्जन’ नाटकाबरोबरच नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या एकांकिकेचेही सादरीकरण होणार आहे. याशिवाय, नाशिकच्याच प्राजक्त देशमुख लिखित व दिग्दर्शित ‘मुक्ती’ या संगीतयात्रेचेही आयोजन करण्यात आले आहे.नागपूरच्या नाट्यसंमेलनात दि. २३ फेबु्रवारी रोजी दत्ता पाटील लिखित आणि सचिन शिंदे दिग्दर्शित ‘विसर्जन’ या दोन अंकी नाटकाचे सादरीकरण होणार आहे. विश्वास ठाकूर निर्मित या नाटकाने नुकत्याच झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेत विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या नाटकात नीलेश सूर्यवंशी, दीप्ती चंद्रात्रे, धनंजय गोसावी यांच्यासह २७ नाशिककर कलावंत भूमिका साकारत आहेत. आनंद ओक आणि रोहित सरोदे यांचे संगीत असून राहुल गायकवाड यांची प्रकाशयोजना आहे. लक्ष्मण कोकणे आणि शेखर सरोदे यांनी नेपथ्याची बाजू सांभाळली आहे. नाशिकच्या नाट्यपरिषद शाखेने या नाटकाची नाट्यसंमेलनासाठी शिफारस केली होती. या नाटकाबरोबरच दि. २३ फेबु्रवारीलाच नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्यावतीने ‘तो, ती आणि नाटक’ या एकांकिकेचे सादरीकरण होणार आहे. प्रिया जैन लिखित आणि आंनद व कृतार्थ दिग्दर्शित या नाटकात कृतार्थ कन्सारा, मंजुषा फणसळकर, प्रतिक विसपुते, प्रसाद काळे, जुई खामकर, हृषिकेश मांडे हे नाशिककर कलावंत भूमिका साकारत आहेत. संगीत रोहित जाधव व जितेंद्र सोनार यांचे असून प्रणव सपकाळे यांची प्रकाशयोजना आहे. धनंजय निकम यांनी नेपथ्याची बाजू सांभाळली आहे.संगीतयात्रेने वाजणार सूपसध्या व्यावसायिक रंगभूमीवर ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाच्या माध्यमातून नाशिकचे नाव उंचावणा-या प्राजक्त देशमुख लिखित आणि दिग्दर्शित ‘मुक्ती’ या संगीत मैफलीचेही नाट्यसंमेलनात आयोजन करण्यात आले आहे. संत कवयित्रींवर आधारित या संगीत यात्रेनेच नाट्यसंमेलनाचे सूप वाजणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक