शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

दुचाकीस्वारांवर बिबट्याची झडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:53 IST

तालुक्यातील पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने दुचाकीस्वारांवर हल्ले चढविल्याने परिसरात मोठी घबराट पसरली आहे. परिसरातील जनावरांना भक्ष्य करणाऱ्या बिबट्याने आता मानवांवरदेखील झडप घातल्याने परिसरात अनेक गावांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

एकलहरे : तालुक्यातील पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने दुचाकीस्वारांवर हल्ले चढविल्याने परिसरात मोठी घबराट पसरली आहे. परिसरातील जनावरांना भक्ष्य करणाऱ्या बिबट्याने आता मानवांवरदेखील झडप घातल्याने परिसरात अनेक गावांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.शनिवारी सायंकाळी चांदगिरी येथे दुचाकीवरून जाणाºया कुटुंबावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली असतानाच रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास पुन्हा एका दुचाकीस्वारावर बिबट्याने झडप घालून त्यास जखमी केले.उसाच्या शेतामध्ये वास्तव्य असलेल्या बिबट्याचे अनेक ठिकाणी दर्शन घडू लागल्याने परिसरातील गावांमध्ये भीती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून आजूबाजूच्या गावांमध्ये जनावरांना भक्ष्य केलेल्या या बिबट्याने आता मानवांवर हल्ले केल्यामुळे हिंगणवेढे, सामनगाव, कोटमगाव, जाखोरी, चांदगिरी आदि गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या शनिवारी सायंकाळी ७.३०च्या सुमारास चांदगिरी गावातील शरद बागूल यांच्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीस्वार दौलत पवार यावर हल्ला केला. पिंपळस येथील पवार हे पत्नी आणि मुलांसोबत जात असताना बिबट्याने उसाच्या शेतातून त्यांच्यावर झडप घातली. यात तिघेही जखमी झाले आहेत. रविवारी रात्री ९.३०च्या सुमारास जाखोरी येथील विश्वास कळमकर यांच्या शेतात काम करणारे शेतमजूर मधुकर बरब व एकनाथ गरेल हे मोटारसायकलवरून जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावांमध्ये बिबट्याचे दर्शन घडत आहे. या भागात किमान पाच बिबटे असावेत, असा अंदाज वर्तविला जात आहे. नर-मादी व त्यांची दोन बछडे तसेच अन्य एक बिबट्या परिसरात असावा असा संशय आहे.

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिक