शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

दुगाव गटाला दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदाचा मान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 22:23 IST

जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी राष्टवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष व दुगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य डॉ.सयाजीराव गायकवाड यांना संधी मिळाल्याने चांदवड तालुक्यात व दुगाव जिल्हापरिषद गटाला दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.

ठळक मुद्देसयाजीराव गायकवाड : राजकीय वारशाचा लाभ

महेश गुजराथी।चांदवड : जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी राष्टवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष व दुगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य डॉ.सयाजीराव गायकवाड यांना संधी मिळाल्याने चांदवड तालुक्यात व दुगाव जिल्हापरिषद गटाला दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.यापुर्वी मधुकरराव सोनवणे यांच्या रुपाने जिल्हापरिषद अध्यक्षपद मिळाले होते तर या दुगाव जिल्हा परिषद गटातुन निवडून आलेले शिरीषकुमार कोतवाल यांनाही यापुर्वी उपाध्यक्षपदाची संधी मिळाली होती . याच गटाने कोतवाल यांचे राजकीय पुर्नवसन केल्याने पुन्हा त्यांना आमदारकीची संधी अपक्ष म्हणून मिळाल्याचा इतिहास याच गटाला आहे. त्यांनी आमदारकीची निवडणुक लढविली. त्यांच्या रिक्त जागेवर २००९ मध्ये डॉ.सयाजीराव गायकवाड यांना अडीच वर्ष जिल्हा परिषद सदस्य पदाची पहिली संधी मिळाली होती. तर डॉ. सयाजीराव गायकवाड यांचे वडील माजी आमदार स्व. डॉ. ना.का. गायकवाड यांनी सन १९७९ मध्ये जिल्हा परिषद दुगाव गटातुन मतदारांनी सदस्यांची संधी दिली व लगेच सन १९८० मध्ये ते आमदार झाल्याचा इतिहास आहे. त्यामुळे या दुगाव जिल्हा परिषद गटाने जिल्हा परिषद अध्यक्ष, त्या पाठोपाठ उपाध्यक्ष दोनदा संधी देणारा हा मतदार आहे.माजी आमदार डॉ. ना. का. गायकवाड यांचा राजकीय वारसा लाभल्याने व राष्टÑवादी कॉँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांनी राष्टÑवादी कॉँग्रेस पक्ष संघटन केले तर प्रत्येक आंदोलनात सहभाग नोंदविला आहे. डॉ. सयाजीराव गायकवाड यांच्या परिवारात आई सिताबाई, मोठे बंधु अशोक गायकवाड, पत्नी डॉ. विजया, मुलगा अनिकेत , मुलगी आर्या , भावजई, पुतणे , काका यांचा समावेश आहे तर त्यांचा मुलगा अनिकेत अहमदाबादमध्ये शिक्षण घेऊन तो पुणे येथे चांगल्या पदावर नोकरीस आहे.डॉ. सयाजीराव गायकवाड गेल्या अनेक वर्षापासून गंगापूररोडवरील मन्वंतर बंगल्यावर राहतात तर त्यांना पहिल्यापासून व्यायाम व पोहण्याची आवड असून दरवर्षी लोकमतने आयोजित केलेल्या महामॅरेथॉन मध्ये सहभाग घेतात तर दररोज पहाटे ते पोहण्यासाठी उपस्थित असतात हे त्यांचे व्यायामाची गोडी म्हणून विशेष उल्लेख होईल असे काम आहे.शेतकरी कुटूंबात जन्मडॉ. गायकवाड उसवाड गावचे रहिवासी असून शेतकरी कुंटूबात जन्म झाला आहे. त्यांना राजकारणाचा वारसा असून त्यांचे मोठे बंधु अशोक गायकवाड सध्या चांदवड तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष आहेत. गायकवाड पेशाने डॉक्टर असून त्यांचे शिक्षण बी.ए.एम.एस.आहे. ते चांदवड तालुका राष्टÑवादी कॉँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष असून यापुर्वी ते तीन वेळा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे संचालक राहिले आहेत. सन १९९२ ते १९९७ पाच वर्षे, सन २००२ ते २००७ पाच वर्षे २००७ ते २०१२ असे तीन वेळा ते संचालक होते. ते तीन वेळा पाच पाच वर्ष पुणे विद्यापीठ पुणे सिनेट पदी सदस्य होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषद