शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पळवून भाजपाने नाशिककरांच्या पाठीत खंजीर खुपसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 15:56 IST

नाशिककरांनी भाजपाकडे एकहाती सत्ता दिली आहे. नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता, शहरातील तिन्ही आमदार त्याचप्रमाणे पालकमंत्री आणि सरकारसुद्धा भाजपाचे असूनही

ठळक मुद्देमाजी खासदार समीर भुजबळ यांची टिका

नाशिक : नाशिक जिल्हा दुष्काळात होरपळत असताना शासनाकडून नाशिक जिल्ह्यातील धरणांचे पाणी जायकवाडीला सोडण्याचा निर्णय घेणे हे अत्यंत दुर्दैवी असून, सत्ताधारी भाजपाकडून पाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध असल्याचे दाखविण्याचा खोटा प्रयत्न करणे हा नाशिककरांच्या भावनांशी चालविलेला खेळ आहे, असे नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी म्हटले आहे.या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात समीर भुजबळ यांनी म्हटले आहे की, नाशिककरांनी भाजपाकडे एकहाती सत्ता दिली आहे. नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता, शहरातील तिन्ही आमदार त्याचप्रमाणे पालकमंत्री आणि सरकारसुद्धा भाजपाचे असूनही वेळोवेळी सत्ताधारी भाजपाकडून नाशिककरांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले जात आहे. नाशिक शहरातील करवाढ करतानाही नाशिककरांनी सत्ताधाऱ्यांच्या नौटंकीचा अनुभव घेतला आहे. नाशिककरांना पिण्याच्या पाण्याची चिंता असताना नाशिकचे पाणी डोळ्यादेखत जाणे हे अतिशय दुर्दैवी आहे. एकीकडे जलसंपदा विभागाचे मंत्री हे नाशिकचे पालकमंत्री असताना नाशिकचे पाणी पळविले जाणे ही सत्ताधारी भाजपाकडून नाशिककरांची दिशाभूल आहे. नाशिक महानगरपालिकेच्या महासभेमध्ये सत्ताधाºयांकडून गंगापूरमधील पाण्यासाठी विषय घेतला जातो, हा नाशिककरांच्या भावनांशी खेळ आहे. नाशिक शहरातील सत्ताधाºयांनी नाशिकचे दत्तक पिता मुख्यमंत्री व नाशिकचे पालकमंत्री असलेले जलसंपदामंत्री यांच्याकडे जाऊन नाशिकमधील तीव्र दुष्काळाची वस्तुस्थिती लक्षात आणून देण्याची आवश्यकता होती. जायकवाडीला सोडल्या जाणाºया पाण्याबाबत न्यायालयाचा निर्णय म्हणून सरकारकडून सांगितले जाते. कोर्टाने निर्णय दिला असे सांगून हात झटकायचे; मात्र नाशिककरांवर होणारा अन्याय सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणे ही सरकारची जबाबदारी नाही काय? असा सवालही समीर भुजबळ यांनी केला आहे. नाशिककरांच्या हक्काचे पाणी राजकीय लाभाकरिता इतरत्र देणे हे सत्ताधाºयांना शोभनीय नसल्याचे समीर भुजबळ यांनी शेवटी म्हटले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक