शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांच्या ‘त्रिसूत्री’मुळे विषयांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:40 IST

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे स्वीकारून दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी त्यांनी अवलंबिलेल्या ‘त्रिसूत्री’मुळे बुधवारी (दि. २८) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत एकही प्रस्ताव विषयपत्रिकेवर येऊ शकला नाही. त्यामुळे सभापतिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अंदाजपत्रकीय सभा वगळता झालेल्या पहिल्याच बैठकीत प्रशासनाकडून अवलोकनार्थ (केवळ माहितीस्तव) ठेवण्यात आलेल्या प्रस्तावांवरच चर्चा करण्यात सदस्यांनी धन्यता मानली.

नाशिक : आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे स्वीकारून दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी त्यांनी अवलंबिलेल्या ‘त्रिसूत्री’मुळे बुधवारी (दि. २८) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत एकही प्रस्ताव विषयपत्रिकेवर येऊ शकला नाही. त्यामुळे सभापतिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अंदाजपत्रकीय सभा वगळता झालेल्या पहिल्याच बैठकीत प्रशासनाकडून अवलोकनार्थ (केवळ माहितीस्तव) ठेवण्यात आलेल्या प्रस्तावांवरच चर्चा करण्यात सदस्यांनी धन्यता मानली. दरम्यान, यापुढे स्थायी समितीवर विषय असो अथवा नसो, दर गुरुवारी सभा घेण्यात येणार असल्याचे सभापतींनी जाहीर केले आणि सभेला वेळेवर हजर राहण्याची तंबीही अधिकारीवर्गाला दिली. स्थायी समितीत शिवसेनेचे दोन आणि मनसेचा सहयोगी सदस्य वगळता सभापतीसह अन्य सर्व सदस्य नव्याने नियुक्त झालेले आहेत. सभा पतिपदी भाजपाच्या हिमगौरी अहेर-आडके या आरूढ झाल्यानंतर अंदाजपत्रकीय सभा वगळता झालेल्या पहिल्याच बैठकीला विष यपत्रिकेवर एकही प्रस्ताव नव्हता. त्यामुळे प्रशासनाकडून विषयपत्रिकेवर केवळ सदस्यांच्या माहितीसाठी अवलोकनार्थ ठेवण्यात आलेल्या प्रस्तावांवर चर्चा घडवून आणण्यात आली. आयुक्त अथवा अतिरिक्त आयुक्तांच्या अधिकारात असलेले विषय स्थायी समितीवर केवळ अवलोकनार्थ ठेवण्यात येतात.त्याला मंजूर-नामंजूर करण्याचा अधिकार स्थायीला नसतो. बैठकीत प्रामुख्याने फाळके स्मारकातील दुरुस्तीसंबंधी झालेल्या कार्योत्तर खर्चाची माहिती ठेवण्यात आली. त्यावर ठेक्याची मुदत संपली असेल तर मुदतीत निविदाप्रक्रिया का राबविली गेली नाही, असा सवाल उद्धव निमसे यांनी उपस्थित केला. मात्र, संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित नसल्याने त्यावर नुसतीच चर्चा झाली. त्यानंतर छपाईसाठी वार्षिक इ-निविदा दर मंजूर करण्याचा प्रस्ताव आला असता, त्यावर दिनकर पाटील यांनी आक्षेप घेत गेल्या दहा वर्षांपासून त्याच-त्या ठेकेदारांना कामे दिली जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. उद्धव निमसे यांनी दरपत्रकातील अटी-शर्तीत सुधारणा होण्याची गरज व्यक्त केली. मुशीर सय्यद यांनीही दरपत्रकाबाबत आक्षेप घेतला. त्यामुळे सभापतींनी पुढील सभेत दरपत्रकासंबंधीची सविस्तर माहिती सभेत ठेवण्याचे आदेशित केले. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या सरकारच्या धोरणांबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहोचविलीच जात नसल्याचा आरोप उद्धव निमसे यांनी केला. नगररचना विभागाच्या कारभारावर बोट ठेवत त्यांनी सरकारी मोजणी नकाशा हा नगररचना विभागानेच तयार केला पाहिजे, असे स्पष्ट केले. मात्र, नगररचना सहायक संचालक आकाश बागुल यांनी प्रत्येक प्रकरण वेगवेगळे असल्याने जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणी नकाशा आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी आयुक्त मुंढे यांच्या नावाने अधिकारीवर्ग नागरिकांमध्ये दहशत पसरवित असल्याचाही आरोप निमसे यांनी केला. यावेळी सभापतींनी शासनाच्या या धोरणाबाबत व्यापक जनजागृती करण्याचे आदेश दिले. दरम्यान, अंदाजपत्रकीय सभेचे कार्यवृत्त दुरुस्तीसह मंजूर करण्यात आले. यावेळी प्रवीण तिदमे यांनी अंदाजपत्रकातील त्रुटी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्या.सभा वेळेवरच होणारस्थायी समितीची सभा बरोबर सकाळी ११.३० वाजता सुरू झाली. त्यापूर्वीच सभापतीसह सदस्य सभागृहात येऊन बसले परंतु, अतिरिक्त आयुक्तांसह विविध खात्यांचे अधिकारी हजर न झाल्याने उद्धव निमसे यांनी याबाबतचा जाब विचारला. त्यानंतर सभापती हिमगौरी अहेर-आडके यांनी स्थायी समितीची सभा दर गुरुवारी सकाळी ११.३० वाजता होणार असल्याचे सांगत वेळेत अधिकारीवर्गाने हजर राहावे, असे आदेशित केले. सभेचे कामकाज सुरू होऊनही उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर हे हजर झाले नव्हते. ते आयुक्तांकडे असल्याचे सांगण्यात आले. मात्र, यापुढे स्थायीच्या बैठकीच्या वेळी कुणीही अधिकारी गैरहजर राहणार नाही, अशी तंबी सभापतींनी दिली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका