शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ओखी चक्रीवादळामुळे नाशिक जिल्ह्यातील तेराशे हेक्टरचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 14:26 IST

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ओखी चक्रीवादळाने अरबी समुद्रालाही धडक दिल्यामुळे त्याचे परिणाम राज्यातील अनेक जिल्ह्यांवर झाले. नाशिक जिल्ह्यात ४ ते ६ डिसेंबर या काळात ढगाळ हवामान व कडाक्याच्या थंडीचे वारे वाहून काही ठिकाणी पावसाने झोडपूनही काढले. या पावसामुळे साधारणत: द्राक्ष पिकाचे प्रचंड नुकसान झाले.

ठळक मुद्देओखी नुकसानग्रस्तांसाठी सव्वादोन कोटींची गरजतेराशे हेक्टरचे नुकसान : प्रशासनाकडून प्रस्ताव सादर

नाशिक : डिसेंबर महिन्यात आलेल्या ओखी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतक-यांच्या शेतीपिकांच्या नुकसानभरपाई पोटी दोन कोटी ३३ लाख रुपयांची गरज असून, कृषी विभागाने पीक पंचनामे पूर्ण करून दिलेल्या अहवालाच्या आधारे शासनाकडे रकमेची मागणी करणारा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ओखी चक्रीवादळाने अरबी समुद्रालाही धडक दिल्यामुळे त्याचे परिणाम राज्यातील अनेक जिल्ह्यांवर झाले. नाशिक जिल्ह्यात ४ ते ६ डिसेंबर या काळात ढगाळ हवामान व कडाक्याच्या थंडीचे वारे वाहून काही ठिकाणी पावसाने झोडपूनही काढले. या पावसामुळे साधारणत: द्राक्ष पिकाचे प्रचंड नुकसान झाले. अनेक द्राक्षबागांमध्ये पावसाचे पाणी साचले, तर काही ठिकाणी घडे जमिनीवर पडले. कडाक्याच्या थंडीने द्राक्ष मण्यांना तडे जाण्याचे प्रकारही घडले. याशिवाय खळ्यात काढून ठेवलेला कांदा व मक्याचे पीक भिजले, काही ठिकाणी गहू जमीनदोस्त झाला. नाशिकसह राज्यातील शेतक-यांचे प्रचंड नुकसान झालेले असताना, शासनाने आठ दिवस उशिराने पीक पंचनाम्याचे आदेश दिले, परिणामी शेतकºयांनी शेतात झालेल्या नुकसानीची सारवासारवी करून घेतली त्यामुळे पीक पंचनामे करताना मोठी अडचण निर्माण झाली. या संदर्भात शासनाकडे तक्रारी करण्यात आल्याने, शासकीय यंत्रणा पीक पंचनामे करतेवेळी संबंधित शेतक-यांनी शेतात हजर राहावे, अशा सूचनाही केल्या होत्या. नाशिक जिल्ह्यातील १७० गावांना ओखी वादळाचा फटका बसून, १५०६ शेतक-यांच्या ताब्यातील १२९५ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले.शासनाने ओखी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना बागायत पिकांखालील क्षेत्रासाठी दोन हेक्टरपर्यंत १३,५०० रुपये, तर फळपिकाखालील क्षेत्रासाठी १८,००० रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली. त्यानुसार जिल्ह्यातील शेतक-यांना नुकसानभरपाई पोटी दोन कोटी ३३ लाख ८,२९० रुपयांची गरज आहे. कृषी खात्याने अंतिम पंचनामे करून तसा प्रस्ताव जिल्हाधिका-यांना सादर केला असून, शेतक-यांना नुकसानभरपाई देण्यासाठी शासनाकडे निधी मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक