शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
6
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
7
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
8
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
9
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
10
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
11
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
12
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
13
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
14
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
15
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
16
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
17
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
18
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
19
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
20
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात

गृहमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे ‘रूग्णालय बंदी

By admin | Updated: January 30, 2015 00:31 IST

गृहमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे ‘रूग्णालय बंदी

’नाशिक : तब्बल तीन तास उशिराने जिल्हा रुग्णालयाला सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांनी भेट देत पाहणी केली, परंतु या सर्व प्रकारात रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाइकांना वेठीस धरल्याने रुग्णांची मोठी हेळसांड झाली़ यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली़, तर हा नियोजित दौरा नसून अचानक केलेली पाहणी असल्याचे सांगत वेळ मारून नेण्याचा केवीलवाणा प्रयत्न मंत्र्यांनी केला़ गृह व सार्वजनिक आरोग्यमंत्री राम शिंदे हे जिल्ह्यात लग्नसमारंभासाठी आले होते़ यातच त्यांनी कुंभमेळ्याचा आढावा, मध्यवर्ती कारागृहाला भेट व जिल्हा रुग्णालयाला भेट देण्याचे नियोजन केले होते़ मध्यवर्ती कारागृहात सकाळी ११, तर जिल्हा रुग्णालयात ११़३० वाजण्याची वेळ देण्यात आली होती़ यामुळे सकाळी १० वाजल्यापासूनच जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेर काढण्यात आले होते़, तर दोन दोन वेळा स्वच्छता करण्यात येऊन एकदम चकाचक करण्यात आले होते़ रुग्णालय असले तरी अ‍ॅम्बुलन्स वगळता इतर वाहनांना मनाई करण्यात आली होती. रुग्ण घेऊन आले असले तरी प्रवेश दिला जात नव्हता.सर्व आरोग्य यंत्रणेसह रुग्ण व नातेवाईकही मंत्री येण्याची व दौरा कधी पार पडून जातो याची आतुरतेने वाट पाहत होते़ परंतु मंत्र्यांनी दिलेली वेळ टळून गेल्यानंतर रुग्णांची व नातेवाइकांची चुळबूळ वाढली़ अखेर तब्बल तीन तास उशिराने लग्नकार्य, कारागृह भेट, जेवण उरकून मंत्रिमहोदयांचे आगमन झाले़ त्यांनी धावता म्हणजे अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत दौरा आटोपला आणि प्रस्थानही ठेवले़ यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना तब्बल तीन तास वेठीस धरण्यात आले़ यामुळे संतप्त रुग्णांच्या नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली़ (प्रतिनिधी)