शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कर्जवसुलीच्या स्थगितीमुळे जिल्हा बॅँकेचा गाडा रुतणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 18:53 IST

यंदा कमी पर्जन्यमानामुळे राज्यावर दुष्काळी परिस्थिती ओढवली असून, शासनाने दुष्काळ जाहीर करण्यासाठी लागू केलेल्या प्रणालीनुसार १५१ तालुक्यांमध्ये व २६८ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळाला तोंड देण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना लागू करतानाच त्यांच्या पीककर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत सर्व प्रकारच्या कर्जवसुलीला

ठळक मुद्देराज्यात ४५ हजार कोटी थकणार : बॅँकाचे लक्ष कर्जमाफीकडे

नाशिक : राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वप्रकारच्या पीककर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील जिल्हा बॅँकांचे आर्थिक गणित बिघडणार असून, नाशिकसह राज्यातील बॅँकांच्या सुमारे ४५ हजार कोटी रुपयांच्या वसुलीला ब्रेक लागला आहे. सरकारने दिलेल्या स्थगितीतून मार्ग कसा काढावा? असा प्रश्न बॅँकांना पडलेला असताना आता सा-यांच्या नजरा केंद्र सरकारच्या प्रस्तावित शेतकरी कर्जमाफीकडे लागल्या आहेत.यंदा कमी पर्जन्यमानामुळे राज्यावर दुष्काळी परिस्थिती ओढवली असून, शासनाने दुष्काळ जाहीर करण्यासाठी लागू केलेल्या प्रणालीनुसार १५१ तालुक्यांमध्ये व २६८ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळाला तोंड देण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना लागू करतानाच त्यांच्या पीककर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत सर्व प्रकारच्या कर्जवसुलीला स्थगिती दिली आहे. मुळातच गेल्या वर्षी शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यास अद्यापही शेतकरी पुढे येत नसल्यामुळे जिल्हा बॅँकांना सन २०१६-१७ या वर्षी वाटप केलेले शेकडो कोटींचे पीक कर्जवसुलीत अडचणी आल्या आहेत. जेमतेम शेतकºयांनी या योजनेचा लाभ घेतला, परंतु दीड लाखांहून अधिक पीककर्ज घेतलेल्या शेतकºयांनी या योजनेकडे साफ दुर्लक्ष केल्यामुळे बॅँकांची कर्जवसुली होऊ शकली नाही. परिणामी यंदा खरिपासाठी पीककर्ज देण्यास तसेही जिल्हा बॅँकांकडे पुरेसा निधी उपलब्ध नव्हता, त्यातच पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेल्यामुळे तसेही शेतकºयांनी बॅँकांच्या कर्जवसुली पथकाला माघारी पाठविले होते. अशा परिस्थितीत शासनाने कर्जवसुलीला अधिकृत स्थगिती दिल्यामुळे त्याचा थेट परिणाम जिल्हा बॅँकांवर होणार आहे. एकट्या नाशिक जिल्हा बॅँकेच्या २१०० कोटी रुपयांची कर्जवसुली थांबणार असून, राज्यातील ३२ जिल्हा बॅँकांचा विचार करता ही रक्कम जवळपास ४० ते ४५ हजार कोटी रुपयांची रक्कम अडकून पडणार आहे. मुळातच शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची शेकडो कोटी रक्कम अद्यापही जिल्हा बॅँकांना मिळालेली नाही. अशा परिस्थितीत शासनाने निव्वळ पीककर्जच नव्हे तर शेतीशी निगडीत सर्व प्रकारच्या कर्जवसुलीला स्थगिती दिल्यामुळे बॅँकेकडे दैनंदिन जमा होणाºया सर्व प्रकारच्या वसुलीलाच ब्रेक लागल्याने त्यांचे आर्थिक गणित बिघडणार आहे. त्यामुळे आता बॅँकांना केंद्र सरकारच्या प्रस्तावित कर्जमाफीची आस लागून असून, तसे झाल्यास जिल्हा बॅँका मालामाल होतील असे जाणकारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :bankबँकNashikनाशिक