शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

साठवण तलावाचा पाणीसाठा संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:23 IST

येवला : शहराला पाणीपुरवठा करणारा ५० दलघफू क्षमतेच्या साठवण तलावाचा तळ उघडा पडला आहे. गंगासागर तलावातील पाण्याची मोजणीदेखील करता येण्याची स्थिती राहिलेली नसल्याने आता शहरवासीयांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. शहराला सात दिवसांआड मिळणारे हे अखेरचे पाणी असणार आहे.

ठळक मुद्देयेवला : शहराच्या पाणीटंचाईच्या तीव्रतेत वाढ

येवला : शहराला पाणीपुरवठा करणारा ५० दलघफू क्षमतेच्या साठवण तलावाचा तळ उघडा पडला आहे. गंगासागर तलावातील पाण्याची मोजणीदेखील करता येण्याची स्थिती राहिलेली नसल्याने आता शहरवासीयांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. शहराला सात दिवसांआड मिळणारे हे अखेरचे पाणी असणार आहे. पालिका आता शहराला केवळ एकदाच पाणी पुरवू शकेल, अशी स्थिती आहे.चार महिन्यांपासून येवला शहरवासीय अगदी काटकसरीने पाणी वापरत आहेत. अंतिम टप्प्यातदेखील आवर्तन येईपर्यत शहरवासीयांना पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे.उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे तालुक्यासह शहरात पिण्याच्या पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून यापुढेही अजून भयावह चित्र होण्याची भीती व्यक्त होत आहे. साठवण तलावाभोवती असलेल्या असंख्य विहिरींमधील होणारा दररोजचा पाणी उपसा तसेच वाढत्या उष्णतेमुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन, जमिनीतील पाण्याचा झिरपा यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगासागर तलावातील पाणी संपले असून शहरात केवळ एक वेळ पाण्याचा पुरवठा होऊ शकतो अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर मात्र शहरवासीयांना पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. शहरात आज पाण्याची तीव्रटंचाई निर्माण झाली असून, नागरिक पाण्यासाठी भटकताना दिसत आहेत. पालखेडचे पुढील आवर्तन जूनच्या पहिल्या आठवड्यात मिळणार असल्याची माहिती आहे. आवर्तन सुटल्यानंतरही ९० किलोमीटरपर्यंत चारीलगत असलेले शेकडो डोंगळे यातून होणारी पाणीचोरी व त्यामुळे कमी दाबाने पाणी येवल्यात पोहचते. साठवण तलाव भरून देण्याची पालखेडच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी असतानाही पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे मुख्याधिकारींसह पालिका कर्मचाºयांना पाण्यासाठी रात्रीची गस्त घालावी लागते. शहरात नळांना पाणी आल्यानंतर पाण्याची नासाडी होणार नाही याबाबत साठवण तलावात अल्प पाणीसाठा शिल्लक आहे. शहराला पिण्यासाठी रोज ५० लाख लिटर पाणी लागते. साठवण तलावातील पाणी पुढील आवर्तन येईपर्यंत पुरवावे लागणार आहे. पाणी जपून वापरावे. नागरिकांनी जागरूकता दाखविणे गरजेचे आहे.-संगीता नांदुरकर, मुख्याधिकारी, येवला नगर परिषद