शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणीचे संकट टळले!

By admin | Updated: July 14, 2017 18:09 IST

जूनच्या पावसावर विसंबून पेरणी केलेल्या, परंतु तीन आठवडे पाठ फिरविलेल्या पावसाच्या दमदार पुनरागमनाने जिल्ह्यावर कोसळलेले दुबार पेरणीचे संकट टळले

नाशिक : जूनच्या पावसावर विसंबून पेरणी केलेल्या, परंतु तीन आठवडे पाठ फिरविलेल्या पावसाच्या दमदार पुनरागमनाने जिल्ह्यावर कोसळलेले दुबार पेरणीचे संकट टळले असून, शुक्रवारी मध्यरात्रीपासून संततधार लावलेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने जिल्ह्यात गत वर्षाप्रमाणे सरासरी ४० टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ७५७ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली असून, सर्वाधिक पावसाची नोंद इगतपुरी तालुक्यात करण्यात आली आहे. त्याखालोखाल त्र्यंबकेश्वर येथे १२५, सुरगाण्याला १११ व पेठला ८८ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. नाशिक शहरातही ४८ मिलीमीटर पाऊस झाला. शुक्रवारच्या पावसाने जिल्ह्यातील नांदगाव वगळता सर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात हजेरी लावल्यामुळे पेरणीनंतर पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, विशेष करून पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेठ, सुरगाणा, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांतील भाताची आवणी अडचणीत सापडली होती. जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने त्या भरवश्यावर शेतकऱ्यांनी भाताची आवणी केली, परंतु रोपे तयार झाल्यानंतर भात लावणीसाठी पाहिजे त्या प्रमाणात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली. अशीच परिस्थिती मका, सोयाबीन, बाजरीची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची झाली होती. जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला प्राधान्य दिले होते. पेरणीनंतर पाण्याची गरज असताना जवळपास तीन आठवडे पावसाने दडी मारल्यामुळे पिके धोक्यात आली होती. त्यामुळे गुरुवारपासून सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यातच पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. जिल्ह्यात जुलै महिन्यात पावसाची सरासरी ५६७१ मिलीमीटर इतकी असून, गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात २६४७ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. जून व जुलैचा एकूण पाऊस पाहता जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत ४० टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. गेल्या वर्षी याच काळात जिल्ह्यात ४० टक्के इतका पाऊस झाला होता. त्यामुळे गेल्या आठवड्यात कमी पाऊस झाल्यामुळे व्यक्त होणारी चिंता दूर झाली आहे.