शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूकदारांच्या संपामुळे  बाजारात ड्रायफ्रुटचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:57 IST

वाहतूकदारांच्या संपामुळे औद्योगिक क्षेत्रासह स्थानिक बाजारपेठाही प्रभावित झाल्या आहेत. नाशिकमध्ये सध्या ड्रायफ्रु टचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुका मेवा खरेदी करून साठवणूक करणे अतिशय महागडे व जिकिरीचे असल्याने व्यापारी मागणीच्या प्रमाणात गरजेपुरताच माल उचलतात. त्यामुळे संपकाळात शहरातील ड्रायफ्रुट विक्रेत्याचा माल संपत आला असताना त्यांनी यापूर्वीच्या साठ्यावर आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वाढलेली मागणी कशीबशी पूर्ण केली

नाशिक : वाहतूकदारांच्या संपामुळे औद्योगिक क्षेत्रासह स्थानिक बाजारपेठाही प्रभावित झाल्या आहेत. नाशिकमध्ये सध्या ड्रायफ्रु टचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुका मेवा खरेदी करून साठवणूक करणे अतिशय महागडे व जिकिरीचे असल्याने व्यापारी मागणीच्या प्रमाणात गरजेपुरताच माल उचलतात. त्यामुळे संपकाळात शहरातील ड्रायफ्रुट विक्रेत्याचा माल संपत आला असताना त्यांनी यापूर्वीच्या साठ्यावर आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वाढलेली मागणी कशीबशी पूर्ण केली  असली तरी पुढील एक-दोन दिवसांत शहरात सुक्यामेव्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने शुक्रवारपासून (दि.२०) पुकारलेल्या देशव्यापी संपाला चार दिवस पूर्ण झाल्याने औद्योगिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फटका बसल्यानंतर स्थानिक बाजारपेठेलाही संपाच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. आषाढी एकादशी व आगमी श्रावणमासाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुक्यामेव्याला मागणी वाढलेली असताना नेमक्या याच मालाचा शहरात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संपामुळे नाशिकमध्ये सुक्यामेव्याची सुमारे ९० टक्के आवक घटलेली असताना आषाढी एकादशीमुळे सुके अंजीर, खजूर व बदाम, अक्रोड, काळ्या मनुका, केशर, खारीक, काजू, तीळ, जर्दाळू अशा विविध पदार्थांना मागणी वाढल्याने व्यापाऱ्यांकडे असलेल्या साठा कमी झाला असून, पुढील एक-दोन दिवसांत सुक्यामेव्याची वाहतूक सुरू झाली नाही तर शहरात तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यापाºयांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, जिरा, धने, मिरची, लवंग, मोहरी, ओवा अशा मसाल्याच्या पदार्थांचाही बाजारात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता काही व्यापºयांनी व्यक्त केली आहे. परंतु, अनेक ग्राहक मसाल्याचे पदार्थ वर्षातून एकदाच खरेदी करीत असल्याने मसाल्याच्या पदार्थांची कमतरता तीव्रतेने जाणवणार नसल्याचे मत व्यापाºयांनी व्यक्त केले आहे.  नाशिकमध्ये नवी मुंबईतून मोठ्या प्रमाणात सुकामेवा येतो. त्यापैकी जवळपास ९० टक्के मालाची वाहतूक थांबली असून, पुढील एक-दोन दिवसांत सुक्यामेव्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. सुकामेवा किमतीने महागडा असून, व्यापार रोखीत करावा लागतो. त्याचप्रमाणे साठवणुकीसाठी चांगली यंत्रणा गरजेची असल्याने मोठ्या प्रमाणात साठा करणे शक्य होऊ शकले नाही. त्यामुळे ही टंचाईसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. - महेश ठक्कर, नाशिक गुड्स

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक