शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

तीन राज्यांच्या निकालामुळे समता परिषद फार्मात

By श्याम बागुल | Updated: December 13, 2018 15:42 IST

तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर छगन भुजबळ यांनी राष्टÑवादी पक्षाचे प्रत्येक व्यासपीठ तर गाजवलेच, परंतु अखिल भारतीय समता परिषदेच्या संघटन विस्तारातही गुंतवून घेतले असून, त्यातूनच राज्यातील बीड, श्रीगोंदा, शहादा, सोनगीर या ठिकाणी समता मेळावे घेऊन मरगळलेल्या सैनिकांमध्ये जीव फुकला आहे.

ठळक मुद्देसोमवारी बैठक : राष्टÑीय राजकारणात भुजबळांना महत्व

श्याम बागुलनाशिक : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांपैकी तीन प्रमुख राज्यांमध्ये कॉँग्रेसला मिळालेल्या यशात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचाही खारीचा वाटा असल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले असून, परिषदेचे मध्य प्रदेशचे राज्य अध्यक्ष सिद्धार्थ कुशवाह, तर राजस्थानात दोन आमदारही समता विचाराचेच निवडून आल्याने समता परिषद फार्मात आली आहे. येत्या सोमवारी मुंबईत राज्य कार्यकारिणीची बैठक होणार असल्याने या बैठकीत भुजबळ यांच्या राष्टÑीय राजकारणातील प्रवेशाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर छगन भुजबळ यांनी राष्टÑवादी पक्षाचे प्रत्येक व्यासपीठ तर गाजवलेच, परंतु अखिल भारतीय समता परिषदेच्या संघटन विस्तारातही गुंतवून घेतले असून, त्यातूनच राज्यातील बीड, श्रीगोंदा, शहादा, सोनगीर या ठिकाणी समता मेळावे घेऊन मरगळलेल्या सैनिकांमध्ये जीव फुकला आहे. नजीकच्या काळात सांगोला, वैजापूर, परभणी याठिकाणी मेळावे घेण्याची तयारी समता परिषदेने चालविली असताना, दुसरीकडे मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तीन राज्यांत कॉँग्रेसला मिळालेल्या यशात बहुतांशी मतदारसंघात समता परिषदेने मोठा हातभार लावल्याची माहिती समोर येऊ लागली आहे. चार वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील सतना येथे समता परिषदेची मुहूर्तमेढ रोवणारे सिद्धार्थ कुशवाह हे मूळचे कॉँग्रेसी असले तरी, त्यांनी समतेचा झेंडा हाती घेतल्यामुळे त्यांच्यावर मध्य प्रदेशाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांनी सतना व लगतच्या जिल्ह्यांमध्ये समता परिषदेचा विस्तार केला, परिणामी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सतनासह आजूबाजूच्या विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेसच्या विजयात समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी स्वत: झोकून घेतले होते. त्यामुळे मध्य प्रदेशच्या मंत्रिमंडळात सिद्धार्थ कुशवाह यांची वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली असून, अशाच प्रकारे राजस्थानमध्येदेखील समता परिषदेच्या पुढाकाराने दोन जागांवर विजय मिळाला आहे. छतीसगढमध्ये भाजपाच्या विरोधात वातावरण निर्मितीत समता परिषदेने मोठा हातभार लावल्याचा दावा समता सैनिक करू लागले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर एनडीएपासून नुकतीच फारकत घेतलेले बिहारचे राष्ट्रीय लोकसमता पार्टीचे अध्यक्ष व समता परिषदेचे माजी प्रदेशाध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी बुधवारी पुण्यात छगन भुजबळ यांची भेट घेऊन आगामी राजकीय वाटचालीबाबत तब्बल दोन तास चर्चा केली त्यात बिहारच्या लोकसभा निवडणुकीत समता परिषद रिंगणात उतरण्याची तयारीच्या दृष्टीने चर्चा झाली. गेल्या निवडणुकीत कुशवाह यांच्यासह चार खासदार बिहारमधून समता परिषदेच्या झेंड्याखाली निवडून आले होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक