शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
4
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
5
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
6
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
7
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
8
तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
9
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
10
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
11
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
12
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
13
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
14
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
15
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
16
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
17
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
18
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
19
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
20
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...

आवक घटल्याने नाशकात कोथिंबिर २५ हजार रुपये शेकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 17:42 IST

निफाड तालुक्यातील रामाचे पिंपळस येथील शेतकरी नवनाथ घुटे या शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेल्या प्रति जुडीला २५१ रुपये असा बाजारभाव मिळाला. बाजार समितीत आडत बंद झाल्यानंतर पहिल्यांदा उच्चांकी बाजारभाव मिळाल्याचे

ठळक मुद्दे ग्राहकांना कोथिंबीर घेण्यासाठी कमीत कमी शंभर रुपयांची नोट मोजावी लागत हंगामातील उच्चांक बाजारभाव मिळाला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या काही दिवसांपासून कोथिंबीरची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांच्या स्वयंपाक घरातून कोथिंबीर गायब झाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून कोथिंबिरीचे दर दिवसेंदिवस वाढत चालल्याने कोथिंबिरीच्या दोन काड्या खरेदीसाठी महिलांना कमीत कमी दहा ते पंधरा रुपये मोजावे लागत आहे. मंगळवारी सायंकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या कोथिंबीर मालाला पंचवीस हजार शंभर रुपये शेकडा असा हंगामातील उच्चांक बाजारभाव मिळाला आहे.

निफाड तालुक्यातील रामाचे पिंपळस येथील शेतकरी नवनाथ घुटे या शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेल्या प्रति जुडीला २५१ रुपये असा बाजारभाव मिळाला. बाजार समितीत आडत बंद झाल्यानंतर पहिल्यांदा उच्चांकी बाजारभाव मिळाल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक चंद्रकांत निकम यांनी सांगितले. घुटे यांनी शिवांजली व्हेजिटेबल कंपनीत कोथिंबीर विक्रीसाठी आणली होती.गेल्या काही दिवसांपासून कोथिंबीर प्रति जुडीला शंभर, दीडशे, दोनशे, सव्वा दोनशे ते थेट अडीचशे रुपये असा बाजारभाव मिळत आहे, तर वाढणा-या भावामुळे सर्वसामान्य ग्राहकांना कोथिंबीर घेण्यासाठी कमीत कमी शंभर रुपयांची नोट मोजावी लागत आहे. अनेक स्वयंपाक घरातून सध्या कोथिंबीर गायब झाली आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतरदेखील काही भागात पावसाने हजेरी लावली नाही. काही ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतातील उभे पीक खराब झाले त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला आहे. कोथिंबीर बाजारभाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे तोंडचे पाणी पळाले आहे, तर कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांनी उच्चांकी बाजारभाव मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे.

 

टॅग्स :MarketबाजारNashikनाशिक