शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

संततधारेमुळे टाकेदला भातलागवडीची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 19:02 IST

सध्या सर्वत्र सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे भातलागवडीची लगबग सुरू झाली आहे. एक आठवड्याच्या विश्रांतीनंतर तीन दिवसांपासून टाकेद परिसरात संततधार सुरू झाली आहे.

सर्वतीर्थ टाकेद : तालुक्यात सध्या सर्वत्र सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे भातलागवडीची लगबग सुरू झाली आहे. एक आठवड्याच्या विश्रांतीनंतर तीन दिवसांपासून टाकेद परिसरात संततधार सुरू झाली आहे.सध्या दुबार पेरणी केलेले व सुरुवातीला भात टाकून रोपे तरारून वर आलेली भातरोपे दोन्ही पद्धतीमुळे सर्वत्र भाताची आवणी सुरू आहे. कुणी पारंपरिक पद्धतीने तर कुणी जपानी पद्धतीने आवणी करीत आहे. पावसामुळे सर्वत्रच लगबग सुरू असल्याने मजुरांची वानवा जाणवत आहे.आवणी साठी पुरुष व स्रियांना दोनशे पन्नास रुपये कोरडा रोज दिला जात आहे. अनेक ठिकाणी शेतीमालक स्वखर्चाने मजुरांना घेऊन येतात. वाहनाने परत पोहोच सुद्धा करतात. पूर्वी सकाळी नऊ ते सहा ही वेळ असायची. आता साडेदहा अकराच्या दरम्यान मजूर शेतात जातो व पाच वाजले की लगेच शेतातून बाहेर पाय काढला जातो. आता बहुसंख्य ठिकाणी बैलांऐवजी ट्रॅक्टरनेच शेतीची मशागत केली जात आहे.धामणगाव, अधरवड, आंबेवाडी, खडकेद या पट्ट्यात आवणी सुरू आहे, तर दोन ते तीन दिवसांपासून टाकेद पट्ट्यात भातलागवडीस सुरुवात झाली आहे. मायदरा, धानोशी, अधरवड, अडसरे, टाकेद या भागात भाताच्या आवणीस सुरुवात झाली आहे.जोरदार पावसापेक्षा संततधार सुरू असल्याने हे पाणी शेतातमुरते (जिरते) व विहिरींनापाणी येण्यास सुरुवात होत असते. टाकेद भाग उताराचा व मुरूमयुक्त जमीन असल्याने जोरदारपावसाने पाणी लगेच वाहून जाते म्हणून संततधार पावसाची अपेक्षा आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती