शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

जिल्ह्यात अन्यत्र जाणाऱ्या चाकरमान्यांंची कोंडी

By admin | Updated: August 25, 2015 23:37 IST

कुंभमेळा : रस्ते बंद असल्याने नोकरीच्या ठिकाणी कसे जाणार?

नाशिक : सिंंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणी एकच दिवस असताना पोलीस यंत्रणेने मात्र तीन दिवस रस्ते करकचून बंद करण्याच्या पोलीस यंत्रणेचा फटका नाशिक आणि चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे. नाशिक शहरात सार्वजनिक सुटी सक्तीने दिली जात असली तरी ग्रामीण भागातील शासकीय आणि खासगी आस्थापना सुरूच राहणार आहे. त्यामुळे अशावेळी नोकरीच्या ठिकाणी कसे जायचे असा प्रश्न चाकरमान्यांना पडला आहे. पोलिसांच्या अतिदक्षता नियोजनामुळे कर्मचाऱ्यांना दांडी मारावी लागेल किंवा अनेकांना तर एक दिवसाच्या पगारावर पाणी सोडावे लागणार आहे.येत्या २९ तारखेला पहिली पर्वणी असून, दुसरी पर्वणी १३ तारखेला आहे. या दोन्ही पर्वण्या एकाच दिवशी असून, अन्य दोन पर्वण्या मात्र स्वतंत्र आहे. तीन दिवसांच्या पर्वण्यांसाठी पोलिसांनी नाशिक शहरात कुंभमेळ्या व्यतिरिक्त काहीच घडणार नाही अशी तजबीज करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे पर्वणीच्या आदल्या दिवसांपासूनच रस्ते बंद राहणार असून, पर्वणीच्या दुसऱ्या दिवशी ते खुले केले जाणार आहे. त्यामुळे नाशिक शहरातील विशेषत: मध्यवर्ती भागातील व्यवहार बंदच राहण्याची शक्यता आहे. तथापि, अनेक चाकरमाने मुंबईला रेल्वेने अप-डाउन करतात. तसेच दिंडोरी, ओझर, मालेगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, सिन्नर अशा अनेक भागांत घर आंगण असे अंतर असल्याने तेथे देखील रोज कामासाठी गेल्यानंतर कर्मचारी पुन्हा नाशिकला येतात. इतकेच नव्हे या भागातील अनेक सरकारी, बिनसरकारी कर्मचारी हे रोजच नाशिकमध्ये येतात आणि परत जातात. आता पर्वणीमुळे या कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळू शकेल; परंतु नाशिक शहराबाहेर त्र्यंबकेश्वर वगळता अन्यत्र कोठेही सुट्टी नाही. परिणामी इगतपुरीला कारखान्यात काम करणारे असो, ओझर, निफाडमधील शैक्षणिक संस्था अथवा मालेगाव, मनमाडमधील शासकीय कार्यालये कर्मचाऱ्यांना सुट्टीच नाही, तर ते कामावर कसे येणार? असा प्रश्न निर्र्माण झाला आहे. बरेच अनेक खासगी आणि शासकीय आस्थापनांनी नाशिकमधून दोन चार कर्मचारी येऊ शकत नाही म्हणून सुट्टी दिलेली नाही, तर कामकाजच चालूच राहणार असल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. मंत्रालयात जाणाऱ्या चाकरमान्यांची अशीच अडचण झाली आहे. नाशिकच्या कानाकोपऱ्यातून रेल्वेस्थानक गाठणे शक्य नसल्याने कामावर कसे जायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा सर्व कर्मचाऱ्यांना एकतर दांडी मारून एक दिवसाच्या वेतनावर पाणी सोडावे लागणार आहे. (प्रतिनिधी)