शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

महावितरणच्या त्रुटींमुळेच शहरात अंधार पालिकेत बैठक: वीजपुरवठ्यासाठी मदत; समन्वय समिती स्थापन

By admin | Updated: May 30, 2014 01:05 IST

नाशिक : शहरात दोन दिवस झालेल्या पावसामुळे वीजपुरवठ्यात बिघाड होऊन निम्मे शहर अंधाराच्या खाईत लोटले गेले. महावितरणकडून पावसाळापूर्व कामे वेळेत पूर्ण न झाल्यानेच या समस्येला सामोरे जावे लागल्याचे गुरुवारी महापौर यतिन वाघ आणि आमदार वसंत गिते यांनी बोलावलेल्या बैठकीत स्पष्ट झाले. त्यामुळे शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिकेने महावितरणला मदत देण्याची तयारी दर्शविली आहे, तसेच उभयतांमध्ये समन्वय व्हावा यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक : शहरात दोन दिवस झालेल्या पावसामुळे वीजपुरवठ्यात बिघाड होऊन निम्मे शहर अंधाराच्या खाईत लोटले गेले. महावितरणकडून पावसाळापूर्व कामे वेळेत पूर्ण न झाल्यानेच या समस्येला सामोरे जावे लागल्याचे गुरुवारी महापौर यतिन वाघ आणि आमदार वसंत गिते यांनी बोलावलेल्या बैठकीत स्पष्ट झाले. त्यामुळे शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिकेने महावितरणला मदत देण्याची तयारी दर्शविली आहे, तसेच उभयतांमध्ये समन्वय व्हावा यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शहरात मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस वादळी वार्‍यामुळे झाडे उन्मळून पडली, तसेच अन्य काही अडचणींमुळे वीजपुरवठा खंडित झाला. या पार्श्वभूमीवर महापौर ॲड. यतिन वाघ आणि आमदार वसंत गिते यांनी रामायण येथे महावितरणचे अधिकारी तसेच महापालिकेच्या विद्युत आणि उद्यान विभागाच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक बोलावली होती. महावितरणच्या वतीने दरवेळी पावसाळापूर्व कामे केली जातात. विशेषत: वीजतारांवर पडतील अशी झाडे आणि फांद्या हटविण्यात येतात; परंतु हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सातपूर आणि पंचवटी भागात मोठ्या प्रमाणात झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याचे महावितरणच्या अधिकार्‍यांनी सांगितले. झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी महावितरणकडे उंच शिडी (हायड्रोलिक लॅडर) नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर पालिकेच्या वतीने अशा प्रकारे शिडी उपलब्ध करून देण्याची तयारी महापौरांनी दर्शविली. रस्ता रुंदीकरणात बाधित होणार्‍या रोहित्रांचे स्थलांतर आणि वीजतारा भूमिगत करणे या कामासाठी पुरेसा निधी नसल्याने महापालिकेने आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली. तथापि, महापालिका केवळ संभाजी चौक, संुदरनारायण मंदिर यांसारख्या ठिकाणी रोहित्र स्थलांतरित करण्याचे काम करेल, असे महापौरांनी स्पष्ट केले.वीजतारा भूमिगत करणे किंवा रस्त्याखाली क्रॉसिंग करणे यांसारखी कामे वेळेत व्हावी, रस्ता डांबरीकरण झाल्यानंतर पुन्हा खोदकाम होऊ नये यासाठी पालिकेचा बांधकाम, उद्यान आणि विद्युत विभाग तसेच महावितरण यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून, ४ जून रोजी त्यासंदर्भात बैठक होणार असल्याचे महापौर ॲड. यतिन वाघ यांनी सांगितले. बैठकीस पालिकेच्या विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता वसंत लाडे, कार्यकारी अभियंता शरद बनकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता विभाग-१ चे आर. एल. सोनुले, विभाग-२ चे डी. टी. सायनेकर आदि उपस्थित होते.