शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

लोकमत पुरस्कारामुळे आरोग्य खात्याची धुरा खांद्यावर- डॉ. भारती पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 01:29 IST

महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ‘लोकमत’ने माझ्या अवघ्या सहा महिन्यांच्या खासदारकीच्या कारकिर्दीचे अवलोकन करून उत्कृष्ट संसद पुरस्कारासाठी देशपातळीवर माझी निवड केली. दिल्लीत झालेल्या या सोहळ्यामुळे आपली देशात ओळख तर झालीच, शिवाय भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांनीही या निमित्ताने माझे गुण हेरले. त्यामुळेच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात आपली सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली, अशा शब्दांत डॉ. भारती पवार यांनी कृतज्ञतेची भावना ‘लोकमत’ समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांच्याशी बोलताना व्यक्त केली.

नाशिक : महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ‘लोकमत’ने माझ्या अवघ्या सहा महिन्यांच्या खासदारकीच्या कारकिर्दीचे अवलोकन करून उत्कृष्ट संसद पुरस्कारासाठी देशपातळीवर माझी निवड केली. दिल्लीत झालेल्या या सोहळ्यामुळे आपली देशात ओळख तर झालीच, शिवाय भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांनीही या निमित्ताने माझे गुण हेरले. त्यामुळेच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात आपली सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली, अशा शब्दांत डॉ. भारती पवार यांनी कृतज्ञतेची भावना ‘लोकमत’ समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांच्याशी बोलताना व्यक्त केली.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या आदिवासी राखीव असलेल्या लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच महिला खासदार म्हणून निवडून आलेल्या डॉ. भारती पवार यांचा नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा झाला. डॉ. भारती पवार यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्यापूर्वी ‘लोकमत’ समूहाच्या वतीने सन २०१९ मध्ये लोकसभेत मतदारसंघाचे प्रश्न मांडून, त्याचा हिरिरीने पाठपुरावा करणाऱ्या देशपातळीवरील उत्कृष्ट खासदारांचा शोध घेतला असता, त्यात डॉ. भारती पवार यांची निवड करण्यात आली. दिल्लीत झालेल्या या सोहळ्यात त्यांना ‘उत्कृष्ट संसद सदस्य’ म्हणून गौरविण्यात आले होते. त्याची आठवण ठेवून विजय दर्डा यांनी आवर्जून डॉ. भारती पवार यांच्याशी संपर्क साधून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री पवार यांनी आवर्जून ‘लोकमत’कडून मिळालेल्या पुरस्काराची आठवण करून देत हा पुरस्कारच खऱ्या अर्थाने मला अधिक काम करण्याची प्रेरणा व आशीर्वाद देऊन गेल्याचे सांगितले. ‘लोकमत’च्या पुरस्काराची दखल आपल्या केंद्रीय मंत्रिपदासाठी अधिक फायदेशीर ठरली असून, लोकमतचे ऋण आपण कधीही विसरू शकणार नसल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. केंद्रीय राज्यमंत्री पदी विराजमान होऊनही डॉ. भारती पवार यांनी ‘लोकमत’च्या पुरस्काराची आठवण ठेवल्याबद्दल विजय दर्डा यांनाही काहीसे आश्चर्य वाटले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन ‘लोकमत’ नेहमीच आपल्या पाठीशी राहील, अशी ग्वाहीही विजय दर्डा यांनी दिली. लोकमतच्या ‘रक्ताचे नाते’ या रक्तदान अभियानाला शुभेच्छा देत नागरिकांनी त्यात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. भारती पवार यांनी यावेळी केले.

टॅग्स :NashikनाशिकVijay Dardaविजय दर्डा