शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

जलकुंभात पाणीच पोहचत नसल्याने  पांडवनगरी परिसरात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:26 IST

पांडवनगरी, चड्डा पार्क आणि चेतनानगर परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जलकुंभात पाणीच पोहचत नसल्याने हे जलकुंभ म्हणजे जणूकाही शोभिवंत वस्तू बनत चालल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याबाबत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

इंदिरानगर : पांडवनगरी, चड्डा पार्क आणि चेतनानगर परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जलकुंभात पाणीच पोहचत नसल्याने हे जलकुंभ म्हणजे जणूकाही शोभिवंत वस्तू बनत चालल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याबाबत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.  पांडवनगरी ते कलानगरदरम्यान असलेल्या विविध कॉलनी आणि सोसायट्यांना सुमारे बारा वर्षांपासून अत्यंत कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नेहमीच कृत्रिम पाणीटंचाईस सामोरे जावे लागत होते. त्याची दखल घेऊन सुमारे दोन वर्षांपासून पांडवनगरी परिसरात नव्याने जलकुंभाचे बांधकाम सुरू होते. अखेर नवीन जलकुंभाचे बांधकाम पुन्हा झाल्यानंतर सुमारे एक महिन्यापूर्वी सदर जलकुंभातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. त्यामुळे नव्याचे नऊ दिवस पांडवनगरी ते कलानगर दरम्यान पाणीपुरवठा काही दिवस सुरळीत झाला. परंतु पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ झाली कारण नवीन जलकुंभ असून, तो जलसाठ्याने भरला जात नसल्याने पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने जेमतेम पिण्याचे पाणी सुद्धा होत नाही, तर वापरायचे काय? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लाखो रु पये खर्च करून नवीन बांधण्यात आलेला जलकुंभ जलसाठीने भरत नसल्याने मनपा आयुक्तांनी तातडीने लक्ष घालून पाणीपुरठा सुरळीत करावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे .आंदोलनानंतरही पाणीपुरवठा सुरळीत नाहीप्रभाग क्र मांक ३०च्या नगरसेवकांनी सुमारे दीडशे महिलांसमवेत बोंबाबोंब आंदोलन केले होते. तसेच प्रभाग सभेतही अनेक वेळा प्रशासनास धारेवर धरले तरीही पाणीपुरवठा सुरळीत होईना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नवदुर्गा मित्रमंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष योगेश दिवे, पोपट डावरे, लक्ष्मण गोरे, संजय लोखंडे, कल्पना साळवे, विमल गावंडे यांसह परिसरातील नागरिक आयुक्तांना निवेदन देणार आहेत. गेल्या दहा दिवसांपासून या परिसरात पाणीटंचाई आहे. पाटील गार्डन, महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, कमोदनगर, शास्त्रीनगर, जिल्हा परिषद कॉलनी, देवेंद्र सोसायटी यांसह इंदिरानगर परिसरात पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका