शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मोबदला न मिळाल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 16:07 IST

कुशेगाव : बारा वर्षांपूर्वी साठवण तलावासाठी जमीन संपादित

ठळक मुद्देशासनाकडून टोलवाटोलवी करून कोट्यवधी रु पये भरपाई मिळत नसल्याने आक्र मक शेतक-यांनी सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी यांची भेट घेऊन कैफियत मांडली.

घोटी : कुशेगाव ता. इगतपुरी येथील साठवण तलावासाठी १२ वर्षांपूर्वी संपादित झालेल्या जमिनीची भरपाई देण्यास शासनाकडून टाळाटाळ होत आहे. शेकडो वेळा प्रयत्न करूनही संपादित झालेल्या ४० ते ४५ एकर जमिनीची अडीच कोटी रु पयांची भरपाई मिळत नसल्याने बाधित आदिवासी शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. मृद आणि जलसंधारण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि मंत्रालयाच्या खेटा मारून वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव येथे साठवण तलावासाठी शासनाने १२ वर्षांपूर्वी ४० ते ४५ एकर जमिनीचे संपादन केले होते. यावेळी शेतकऱ्यांना तातडीने योग्य ती भरपाई देण्याबाबत सांगण्यात आले होते. यावर्षीही या तलावांची जलयुक्त शिवार योजनेमधुन दुरु स्ती करण्यात येत आहे. ह्या भूसंपादनामुळे येथील आदिवासी शेतकरी भूमिहीन झाले असून त्यांना उपजीविकेसाठी रानोमाळ भटकावे लागत आहे. ह्या सर्व जमिनीची एकंदरीत भरपाई अडीच कोटी रु पयांच्या आसपास आहे. ही भरपाई मिळण्यासाठी शेतक-यांनी जिल्हाधिकारी कार्यालय ते मंत्रालयापर्यंत शेकडो वेळा प्रयत्न केले. ह्याबाबतची फाईल गायब असल्याचा शेतक-यांना दाट संशय आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यालयात त्यांना लाल फितीचा अनुभव येत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप भरपाई देण्याबाबत अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. शासनाकडून टोलवाटोलवी करून कोट्यवधी रु पये भरपाई मिळत नसल्याने आक्र मक शेतक-यांनी सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी यांची भेट घेऊन कैफियत मांडली. त्यांनी याबाबत भूसंपादन खात्याकडे शेतक-यांना पाठवून दिले. तिथेही शेतक-यांना दाद मिळू शकली नाही. परिणामी वैतागलेल्या शेतकºयांनी आता आक्र मक पवित्रा घेतला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक