शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनशून्य कारभारामुळे  लोकमान्यनगरात दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:10 IST

महापालिकेच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे सिडकोतील विविध भागात रोज दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रभाग क्रमांक २९ मधील दत्त चौक, महाकाली चौक या भागात दूषित पाणीपुरवठा होत असून, त्यापाठोपाठ आता लोकमान्यनगर, राजरत्ननगर व उत्तमनगर भागांतही दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, मनपाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सिडको : महापालिकेच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे सिडकोतील विविध भागात रोज दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रभाग क्रमांक २९ मधील दत्त चौक, महाकाली चौक या भागात दूषित पाणीपुरवठा होत असून, त्यापाठोपाठ आता लोकमान्यनगर, राजरत्ननगर व उत्तमनगर भागांतही दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, मनपाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.  सिडकोतील प्रभाग क्रमांक २९ मधील दत्त चौक, महाकाली चौक व परिसरात गेल्या काही दिवसांपासून दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयात तक्रार दिल्यानंतरही स्वच्छ पाणीपुरवठा होत नसल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर सोमवारी (दि.२३) प्रभागाचे नगरसेवक मुकेश शहाणे, छाया देवांग तसेच रमेश उघडे, दिलीप देवांग यांनी दूषित पाणीपुरवठा होत असलेल्या भागात पाहणी केली असता यावेळी नागरिकांनी दूषित पाणीपुरवठ्याबाबत नगरसेवकांकडे तक्रारी केल्या. यानंतर मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ काम सुरू केले.  या भागातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोच आता प्रभागातील लोकमान्यनगर, राजरत्ननगर व उत्तमनगर भागातही दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी नगरसेवक नीलेश ठाकरे याच्याकडे केली.  नगरसेवक ठाकरे यांनी येथील परिसरात पाहणी केली. यावेळी उपस्थित नागरिक रंजना जाधव, मनीषा भामरे, मीना गायकवाड, अलका जाधव, वंदना चौधरी, सुदर्शन पवार, स्वप्नील वाघ, गणेश वाणी, चंद्रकांत राऊत यांनी तक्रार करीत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नगरसेवक नीलेश ठाकरे यांच्याकडे केली. प्रभाग २९ मध्ये गेल्या काही दिवसांपासून दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असताना याबाबत मनपा अधिकाºयांना गांर्भीयच नसल्याचे दिसून येत आहे. नागरिक याबाबत वारंवार तक्रारी करीत असतानाही याकडे लक्ष दिले जात नसल्याने यापुढील काळात नागरिकांनाच बरोबर घेऊन मनपा कार्यालयावर मोर्चा काढणार आहे.  - नीलेश ठाकरे, नगरसेवक, प्रभाग २९

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाwater transportजलवाहतूक