शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

वीज नसल्याने मनपा अंधारात

By admin | Updated: May 29, 2014 00:48 IST

कामकाज ठप्प : जनरेटरही झाले नादुरुस्त

कामकाज ठप्प : जनरेटरही झाले नादुरुस्तनाशिक : शहरात काल वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे विस्कळीत झालेल्या वीजपुरवठ्याचा फटका महापालिकेलादेखील बसला. आज दिवसभर महापालिकेला वीजपुरवठा होऊ न शकल्याने महापालिका कर्मचार्‍यांना अंधारातच कामकाज करावे लागले. विशेष म्हणजे महापालिकेचे जनरेटरही नादुरुस्त झाल्यामुळे कामगारांसह पदाधिकार्‍यांना अंधारात बसावे लागले. शहरातील वीजपुरवठा अद्यापही विस्कळीतच असून, आज दिवसभर सर्वत्र विजेचा लपंडाव सुरू होता. विशेषत: सिव्हिल हॉस्पिटल, टिळकवाडी, शरणपूररोड, कॅनडा कॉर्नर आणि गंगापूरोड भागात आज दिवसभर वीजपुरवठा खंडित होता. सिव्हिल आणि सातपूर येथील उपकेंद्रांवर दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे या भागाला वीजपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे महापालिकेलादेखील वीजपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे आज विजेअभावी महापालिकेत कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. संगणक कक्षातून एकही कागद बाहेर पडला नाही, तर जे पदाधिकारी कामानिमित्त आपल्या दालनात आले त्यांना भ्रमणध्वनीच्या प्रकाशात काही काळ कामकाज करावे लागले. अधिकार्‍यांनी तर फाईलींना हातही लावला नसल्याचे बोलले जाते. काल झालेल्या वादळीवार्‍यामुळे महापालिका आवारातील एक झाड मनपाच्या जनरेटवर पडल्यामुळे ते निकामी झाले आहे. आज सकाळपासून जनरेटर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले; मात्र काम पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी पदाधिकार्‍यांना अंधारातच बसावे लागले. महावितरणची वीज तसेच मनपाचे जनरेटरही नसल्यामुळे महापालिकेला वीजपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे आज दिवसभर येथील कामकाज ठप्प होते. विजेअभावी कार्यालयांमध्ये अंधार असल्याने कर्मचार्‍यांनी कार्यालयाबाहेर उभे राहाणे पसंत केले. विद्युत विभागाकडून जनरेटर दुरुस्तीचे काम करण्यात येत होते. मात्र सायंकाळपर्यंत जनरेटरच दुरुस्त न झाल्याने कोणत्याही कामकाजाविना आज महापालिकेचा दिवस पार पडला.(प्रतिनिधी) मनपाला एकच जनरेटरमनपा विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर आपल्या दालनात आल्यानंतर त्यांनी काहीकाळ वीज येण्याची वाट पाहिली. त्यानंतर त्यांनी आयुक्त कार्यालयाला विचारणा केली. महावितरणची वीज नसल्याने तसेच आपल्याकडील जनरेटर नादुरुस्त असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी विद्युत विभागाला याविषयी विचारणा केली असता महापालिकेकडे एकच जनरेटर असल्याचे आणि तेही झाड पडल्याने नादुरुस्त झाल्यामुळे ते सुरू करता येणे शक्य नसल्याची हतबलता विद्युत विभागाकडून दर्शविण्यात आली. यावेळी बडगुजर यांनी मनपाला पर्यायी जनरेटर नसल्याबद्दल आ›र्य व्यक्त करून याविषयी आपण आयुक्तांशी बोलणार असल्याचे सांगितले.