शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मागणीअभावी रोपे उकिरड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 23:30 IST

येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून शासनाने सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी लागू केली आहे. परिणामी बंद असलेल्या बाजारपेठा व विपणन व्यवस्था यामुळे टोमॅटो, मिरची लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे.

येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून शासनाने सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी लागू केली आहे. परिणामी बंद असलेल्या बाजारपेठा व विपणन व्यवस्था यामुळे टोमॅटो, मिरची लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे. कोरोनाच्या संकटाने शेतकरीवर्गाकडून टोमॅटो, मिरची रोपांची मागणी रोडावली त्यामुळे पदरमोड करीत रोपे तयार करावे की नाही असा संभ्रम रोपवाटिका चालकांना पडला आहे.कोरोनाच्या फटक्याने रोपवाटिका चालक अडचणीत सापडले आहेत. हंगामाच्या भरवशावर तयार करून ठेवलेल्या रोपांचा पहिला हप्ता मागणीअभावी उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ रोपवाटिका चालकांवर आली आहे.साधारणपणे अक्षय्यतृतीयेनंतर नाशिक जिल्ह्याच्या पिंपळगाव बसवंत व आसपासच्या परिसरात तसेच, येवला तालुक्याला लागून असलेल्या रवंदा भागात नांदूर-मधमेश्वर कालव्याच्या पाण्यावरती व निफाड-लासलगाव भागात टोमॅटो व मिरची लागवडीला सुरु वात होते, परंतु यंदा कोरोनामुळे शेतकरीच संभ्रमात आहे. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांकडून रोपवाटिका चालकांकडे रोपे तयार करण्याची मागणी करण्यात आलेली नाही. हंगामात चांगली मागणी राहील या आशेवर बºयाच रोपवाटिका चालकांनी मिरची व टोमॅटोची रोपे आगाऊ तयार करून ठेवली होती, परंतु कोरोनाच्या फटक्याने रोपवाटिका चालक अडचणीत सापडले आहेत. रोपवाटिका चालकांना हंगामाच्या भरवशावर तयार करून ठेवलेल्या रोपांचा पहिला हप्ता मागणीअभावी उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ आली.सर्वसाधारणपणे १५ ते २० मे पर्यंत ७० टक्के शेतकºयांच्या रोपे तयार करण्याच्या आॅर्डर आलेल्या असतात व अ‍ॅडव्हान्स म्हणून ५० टक्के पैसेही जमा झालेले असतात, परंतु यंदा अजूनपर्यंत पाच-दहा टक्केही शेतकºयांनी रोपांची आॅर्डर दिलेली नाही. काही रोपवाटिका चालकांनी सगळं सुरळीत होईल असा विचार करून नर्सरी बांधकाम करून ठेवले आहे. तर काही आता दिवस जवळ आले आहेत, मिळतील तेवढ्या आॅर्डर्ससाठी का होईना नर्सरीच्या कामाला लागावे असा विचार करून नर्सरी तयार करीत आहेत, परंतु यंदा ३०-४० टक्केही आॅर्डर मिळते की नाही या संभ्रमात नर्सरी चालक आहेत.-------------------------------कृषी विभागही पडला पेचातशेतकºयांनाही अजून टोमॅटो आणि मिरची लागवड करायची की नाही हा निर्णय घेता येत नाही. आतापर्यंत एक ते दोन टक्के टोमॅटो, मिरची लागवड झालेली आहे, जी दरवर्षी ३० ते ४० टक्के झालेली असायची. कृषी विभागालाही शेतकºयांना याबद्दल काय मार्गदर्शन करावे आणि कसे टोमॅटो, मिरची लागवडीसाठी प्रवृत्त करावे असा पेच पडला आहे. लॉकडाउन उठल्यानंतर टोमॅटो आणि मिरचीचा मोठा तुटवडा भासेल असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक