शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

करवाढीचे अधिकार  स्थायीसह महासभेलाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:14 IST

स्थायी समिती व महासभा यांना विचारात न घेता व चौकशीची संधी न देता करयोग्य मूल्य वाढविणे अथवा करवाढ करण्याचे स्वतंत्र अधिकार आयुक्तांना नाहीत. ते मूळ अधिकार स्थायी समिती व महासभा यांनाच आहेत.

नाशिक : स्थायी समिती व महासभा यांना विचारात न घेता व चौकशीची संधी न देता करयोग्य मूल्य वाढविणे अथवा करवाढ करण्याचे स्वतंत्र अधिकार आयुक्तांना नाहीत. ते मूळ अधिकार स्थायी समिती व महासभा यांनाच आहेत. महासभेच्या निर्णयानंतर आयुक्तांचे त्यावर नियंत्रण येते, अशा शब्दांत शहरातील ज्येष्ठ नामवंत कायदेतज्ज्ञांनी आपला अभिप्राय करवाढीच्या अधिकारकक्षाबाबत नोंदविला आहे.  करवाढीचे नेमके अधिकार नेमके कुणाला, यावर महापालिकेच्या महासभेत चर्चा झाली. यावेळी, माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी शहरातील नामवंत विधीज्ज्ञ अ‍ॅड. जयंत जायभावे आणि अ‍ॅड. विलास लोणारी यांनी दिलेला कायदेशीर अभिप्राय सभागृहात मांडला. या कायदेतज्ज्ञांनी बग्गा यांनी केलेल्या मागणीनुसार दिलेल्या अभिप्रायात म्हटले आहे, आयुक्तांना करमूल्य वाढवून कर आकारणीचा प्रस्ताव करावा लागतो. तो प्रस्ताव महाराष्टÑ म्युन्सिपल कॉर्पोरेशन अ‍ॅक्टचे कलम ९५, ९६ आणि ९९ नुसार स्थायी समितीमार्फत महासभेवर २० फेबु्रवारीपूर्वी पाठवून मंजूर करून घेणे कायद्याने आवश्यक आहे. स्थायी समितीने साधक-बाधक चर्चा करून करवाढीचे बजेट तयार करून ते आयुक्तांमार्फत महासभेवर चर्चेसाठी व मंजुरीसाठी पाठविणे आवश्यक आहे. मिळकतीची करवाढ करण्यापूर्वी कलम ९९, १२७ ते १२९ विचारात घेता करयोग्य मूल्य व कॅपिटल व्हॅल्यू कायदेशीर प्रक्रियेने निश्चित होऊन त्या आधारावरच कर दर ठरविणे आवश्यक आहे. त्याची प्रक्रिया तरतुदी व कर नियमांमध्ये दिलेली आहे. करवाढीचा प्रस्ताव करताना चॅप्टर ११ मधील कलम १२७, १२८ व १२९ नुसारचे तरतुदी व त्यातील बंधने यांचा विचार करूनच करवाढीचा निर्णय घेता येईल. स्थायी समिती व महासभा यांना विचारात न घेता व चौकशीची संधी न देता करयोग्य मूल्य अथवा करवाढ करण्याचे स्वतंत्र अधिकार आयुक्तांना नाहीत. ते मूळ अधिकार स्थायी समिती व महासभा यांनाच आहेत. महासभेच्या निर्णयानंतर आयुक्तांचे त्यावर नियंत्रण येते, असे स्पष्टपणे अभिप्रायात नमूद करण्यात आले  आहे.सभागृहातील विधीज्ज्ञांकडूनही युक्तिवादमहासभेत वकील असलेल्या नगरसेवकांनीही कायद्यातील विविध कलमांचा आधार घेत करवाढीचा निर्णय घेण्याचा अधिकार हा स्थायी समिती व महासभेचाच असल्याचे ठामपणे स्पष्ट केले. भाजपाचे अ‍ॅड. अजिंक्य साने यांनी सर्वोच्च न्यायालयातील काही निकालाचे संदर्भ देतानाच तारीख नसलेली आकारणी यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड केल्याबद्दलही जाब विचारला. भाजपाचेच अ‍ॅड. श्याम बडोदे आणि शिवसेनेच्या अ‍ॅड. श्यामला दीक्षित यांनीही महासभेचे अधिकार डावलून आयुक्तांकडून कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका