शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसामुळे टमाटा पिकावर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 16:47 IST

दिंडोरी/लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या संततधार पावसामुुळे टमाटा पीक धोक्यात आले असून त्यावर करपा, बुरशी रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. फूलकळी कुजण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देबळीराजा हवालदिल : करपा, बुरशी रोगाचा प्रादुर्भाव; फूलकळी कुजण्याच्या प्रमाणात वाढ

दिंडोरी/लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या संततधार पावसामुुळे टमाटा पीक धोक्यात आले असून त्यावर करपा, बुरशी रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. फूलकळी कुजण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात टमाटा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यंदा कोरोनामुळे नर्सर्रीमध्ये बुकिंग करूनही टमाटा रोपे न मिळाल्याने बळीराजाला पीक घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. मिळेल त्या ठिकाणाहून रोपे आणून नागपंचमीला बहुसंख्य शेतकऱ्यांनी टमाटा लागवड केली.नगदी पीक म्हणून टमाटा पिकाकडे पाहिले जाते. सुरुवातीच्या पावसावर शेतकरीवर्गाने महागडी रोपे आणून अर्ली टमाट्याची लागवड केली. पिकाची वाढ चांगल्याप्रकारे होत असतानाच पावसाने दडी मारली. याही अवस्थेत शेतकरीवर्गाने जिवाचे रान करीत पीक वाचविले. पीक ऐन बहरात असतानाच पावसाची रिपरिप सुरू झाली. सततच्या संततधार पावसाने अर्ली व नूतन लागवड केलेल्या टमाटा पिकावर संक्रांत आली. पिकावर करपा, बुरशी रोगाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात दिसून येत असल्यामुळे शेतकरीवर्गात चिंता व्यक्त होत आहे. लहान टमाटा पिकाला बुरशी रोगाने विळखा दिल्याने झाडांची वाढ खुंटली आहे. तसेच अर्ली म्हणजे नागपंचमीला लागवड केलेल्या झाडांची वाढ चांगला प्रकारे होत असली तरी झाडांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. झाडांना लागलेल्या फूलकळीत पावसाचे पाणी साचून कळी कुजण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, फूलकळी गळून पडत आहे. सध्या काही शेतकऱ्यांनी टमाटा बाजारपेठेत विक्रीसाठी आणला आहे. आवक कमी असल्यामुळे दरही चांगला मिळत आहे. परंतु रोगाच्या प्रादुर्भावामुळे फळधारणेवर परिणाम झाला असून, शेतकरीवर्गाची आशेची निराशा होण्याचे चित्र दिसत आहे. (२५ लखमापूर १ ते ४)

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती