शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील असमतोलामुळे द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 12:41 IST

वणी - असमतोलीत हवामानामुळे द्राक्षबागांवर प्रतिकुल परिणाम होत असून द्राक्षातील ब्रिक्स म्हणजेच साखरेचे प्रमाण वाढण्यावर याचा परिणाम होत असल्याने द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी भरली आहे.

वणी - असमतोलीत हवामानामुळे द्राक्षबागांवर प्रतिकुल परिणाम होत असून द्राक्षातील ब्रिक्स म्हणजेच साखरेचे प्रमाण वाढण्यावर याचा परिणाम होत असल्याने द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी भरली आहे. द्राक्षपंढरी म्हणून दिंडोरी तालुका परिचीत असून कसदार व पोषक जमीन पाण्याचे स्त्रोत यामुळे द्राक्ष लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढते आहे. विविध जातीची द्राक्षे उत्पादनात तालुका अग्रेसर असुन नवनवीन अद्यावत तंत्राचा वापर करून परराज्यात तसेच परदेशात नावलौकीक प्राप्त केला आहे, मात्र सध्या द्राक्ष उत्पादकांना वेगळ्याच अस्मानी संकटाला सामोरे जावे लागते आहे. गत काही दिवसात थंडीचे प्रमाण वाढले होते, त्याबरोबर ढगाळ हवामानाने उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळविले थंडीचे प्रमाण सद्यस्थितीत तुलनात्मकरित्या कमी झाले असले तरी ढगाळ हवामानाच्या समस्येने उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत. अशा वातावरणात भुरी मिलीबग अशा रोगांना आमंत्रण मिळते तर द्राक्षातील साखरवाढीवर याचा प्रतिकुल परिणाम होतो सर्वसाधारण स्थितीत द्राक्षातील साखरेचे प्रमाण १८ टक्के किंवा त्यापुढे पाहिजे मात्र आता १३ टक्के एवढेच प्रमाण काही भागात असल्याची माहिती काही उत्पादकांनी दिली.परप्रांतातील व्यापारी मोठ्या प्रमाणावर द्राक्ष खरेदीसाठी उत्सुक आहेत, मात्र प्रतिकुल वातावरणामुळे द्राक्षबागा पूर्णत: परिपक्व होण्यास अडचणी येत आहेत. अपवावात्मक स्थितीत काही द्राक्षबागाची खुडणी सुरू आहे, मात्र दराबाबत घासाघीस करावी लागते आहे.दरम्यान नोटबंदीच्या सुलतानी फटक्याच्या विळख्यात सर्वच उद्योगधंदे सापडल्याचे चित्र दिसते आहे. त्यात शेतीव्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. परिस्थिती हळुहळू पूर्वपदावर येण्याची चिन्हे जाणवत असताना द्राक्ष उत्पादक आता सुलतानीबरोबर अस्मानी संकटात सापडला आहे. वर्षभराचे शेतीचे नियोजन उदरनिर्वांहाची तरतुद, मुलांची शैक्षणिक जबाबदारी, विवाह या सगळ्या बाबींची पूर्तता करताना द्राक्ष उत्पादनावर व विक्र ी करून मिळालेल्या पैशावर उत्पादकांचे नियोजन असते मात्र आता प्रतिकुल हवामानापुढे हतबल झालेले उत्पादक रोगप्रतिबंधासाठी एकरी दहा हजाराचा खर्च फवारणीसाठी करीत आहेत. सदरची चिंताजनक बाब उत्पादकांची कसोटी पाहणारी असल्याने द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहेत.