शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

‘एटीएम’मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्धांना मदत करण्याच्या बहाण्याने गंडविणाºयास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:52 IST

नाशिक : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्ध नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने पैसे काढणाºया जेलरोड येथील संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़

ठळक मुद्देपोलीस ठाण्यात गुन्हा दाखलमाहिती काढून संशयिताचा शोध

नाशिक : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्ध नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून पिन नंबर घेतल्यानंतर कार्डची अदला-बदल करून पैसे काढणाºया जेलरोड येथील संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ वरिंदर बिलबहादूर कौशल (३३, रा़ फ्लॅट नंबर २ ए, गजानन अपार्टमेंट, संत नरहरीनगर, जेलरोड, नाशिकरोड) असे या भामट्याचे नाव आहे़पेठरोड येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीममधून श्रीराम भार्गव (६४) हे २० डिसेंबर २०१७ रोजी पैसे काढण्यासाठी गेले होते़ या ठिकाणी असलेला संशयित कौशल याने पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या नावाखाली त्यांच्या एटीएमचा पिन घेऊन कार्डची अदला-बदल केली़ यानंतर नाशिक, ठाणे, मुंबई, जयपूर अशा विविध ठिकाणांहून भार्गव यांच्या खात्यातून चार लाख २५ हजार रुपये परस्पर काढून घेतले़ या प्रकरणी भार्गव यांच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी या संशयिताचा शोध घेण्याचे आदेश दिले होते़ शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंद वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी व पथकाने या गुन्ह्यातील संशयिताची सतत माहिती काढून संशयिताचा शोध घेतला असता तो संशयित वरिंदर कौशल असल्याचे समोर आले़ नाशिकरोड परिसरात राहणाºया कौशल हा सोमवारी सोमवारी (ता.२९) घरी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने सापळा रचला असता संशयित कौशल स्कोडा वाहनातून आला असता त्यास ताब्यात घेतले़ त्याची पोलीस पद्धतीने चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली़ शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, दीपक गिरमे, नागेश मोहिते, जाकीर पठाण, रवींद्र बागुल, दिलीप मोंढे, विशाल काठे, विशाल देवरे यांनी ही कामगिरी केली़ संशयित कौशल यास अधिक तपासासाठी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़अनेक एटीएम कार्डसंशयित कौशलकडून पोलिसांनी अनेक नागरिकांचे एटीएम कार्ड जप्त केले असून, शहरातील अनेकांना त्यांनी मदतीच्या नावाने गंडा घातला आहे़ विशेष म्हणजे नागरिकांना गंडा घालणाºया कौशल हा महागडी चारचाकी वाहने तसेच ऐशोआराम पद्धतीने जीवन जगत होता़