शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

अवजड वाहनांना द्वारका चौफुलीवरून पुण्याचा मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 01:02 IST

शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्वारका चौफुलीवर वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याने त्यावरील उपाययोजनाही तोकड्या पडल्या असून, स्वयंचलित सिग्नल यंत्रणा, वाहतूक पोलिसांची नेमणूक, वळण रस्त्याचा वापर यांसह विविध प्रयोग फसल्यानंतर आता द्वारका चौफुलीचा वापर करून पुण्याकडे जाऊ पाहणाºया अवजड वाहनांना या मार्गाचा वापरच बंद करण्याचा नामी उपाय शहर वाहतूक पोलिसांनी शोधून काढला आहे.

ठळक मुद्देमुंबईकडून पुण्याकडे जाणाया वाहनांना यापुढे सायंकाळी घोटी-सिन्नर मार्गवाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगावाहनचालकांसाठी अधिक खर्चिक व वेळखाऊ

नाशिक : शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्वारका चौफुलीवर वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याने त्यावरील उपाययोजनाही तोकड्या पडल्या असून, स्वयंचलित सिग्नल यंत्रणा, वाहतूक पोलिसांची नेमणूक, वळण रस्त्याचा वापर यांसह विविध प्रयोग फसल्यानंतर आता द्वारका चौफुलीचा वापर करून पुण्याकडे जाऊ पाहणाºया अवजड वाहनांना या मार्गाचा वापरच बंद करण्याचा नामी उपाय शहर वाहतूक पोलिसांनी शोधून काढला आहे. त्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे जाणाºया वाहनांनी यापुढे सायंकाळी घोटी-सिन्नर मार्गाचा वापर करावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.  शहरातून जाणाºया मुंबई-आग्रा महामार्गामुळे नाशिक शहरातील मूळ वाहतुकीला कोणताही धक्का न पोहोचता ती सुरळीत राहण्यासाठी प्रकाश पेट्रोलपंप ते पंचवटीतील के. के. वाघ महाविद्यालयापर्यंत राज्यातील सर्वाधिक लांबीच्या उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात येऊन धुळ्याकडून मुंबईकडे जाणारी व मुंबईकडून धुळ्याकडे जाणारी वाहतूक विना अडथळा मार्गक्रमण करणे अपेक्षित धरण्यात आली होती. तथापि, मुंबईकडून येणाºया वा धुळ्याकडून येणाºया वाहनांना नाशिकमध्ये मालाची चढ-उतार करायचे असल्यास त्यांना राष्टय महामार्गाऐवजी समांतर रस्त्याचा वापर करू लागल्याने त्याचा ताण महामार्गाबरोबरच शहरवासी यांसाठी तयार करण्यात आलेल्या समांतर रस्त्यावरही पडू लागला आहे. त्यामुळे राष्टय महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रकार सातत्याने घडत असताना त्याचा सर्वाधिक ताण द्वारका चौफुलीवर चौहोबाजूंनी पडत आहे. परिणामी या भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा दररोज उभ्या राहात आहेत. सकाळी दहा ते दुपारी बारा व सायंकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत द्वारका चौफुली वाहतुकीसाठी धोकादायक ठरू लागली असून, त्यातून वाहनांचा एकमेकांना धक्का लागण्याच्या तसेच लहान-मोठ्या अपघातांना आमंत्रण मिळू लागले आहे. द्वारका चौफुलीवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या, परंतु त्या सर्व फोल ठरल्या आहेत. त्यामुळे आता दुपारी चार ते रात्री आठ या चार तासांसाठी मुंबईकडून उड्डाणपुलाचा वापर करून रॅम्पने राष्टय महामार्गावर उतरणाया तसेच समांतर पुलाचा वापर करून द्वारका चौफुलीवरून पुण्याकडे जाणाया सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय शहर वाहतूक शाखेने घेतला आहे. तशी अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आली असून, त्याऐवजी वाहनचालकांनी घोटी-सिन्नर मार्गाचा वापर करून पुण्याकडून मार्गस्थ व्हावे, असा उपाय सुचविण्यात आला आहे.वाहनबंदीने अनेक प्रश्न उपस्थितमुंबईकडून येणाºया वाहनांना द्वारका चौफुलीचा वापर करून पुण्याकडे वळण्यास मज्जाव करणे हा पोलिसांचा निर्णय नाशिक शहरातील सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीतील अवजड वाहनांनाही लागू असून, या वाहनांनी औद्योगिक वसाहतीतून थेट घोटीपर्यंत उलट दिशेने प्रवास करून घोटी-सिन्नर मार्गाचा वापर करावा, असे पोलिसांना अपेक्षित आहे. ही बाब वाहनचालकांसाठी अधिक खर्चिक व वेळखाऊ असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. शिवाय या वाहनांना थेट सिन्नरऐवजी नाशिकरोड व पुढे मालाची ने-आण करायची असल्यास त्यांच्यासाठी तर ही अट अव्यावहारिक ठरणार आहे. शिवाय एकीकडे सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून नाशिक-सिन्नर मार्गाचे चौपदरीकरण करून वाहनांचा वेळ वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरीकडे पोलीस वाहनांवर बंदी लादून सरकारचा खर्च निरर्थक ठरवू लागले आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी