नाशिक : भंडारदरा धरणावर मित्रांसमवेत फिरण्यासाठी आलेल्या तरुणाचा धरणात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली़ या तरुणाचे नाव व्यंकट बेमुल्ला पल्ली असे असून, तो मूळचा हैदराबाद येथील असून, सद्यस्थितीत मुंबईत वास्तव्यास होता़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचा हैदराबाद येथील व्यंकट बेमुल्ला पल्ली (२४, रा़ प्लॉट नंबर ३०५, गोनसालवीस हाऊस, बाजार रोड, बांद्रा, मुंबई) हा वीकेंड साजरा करण्यासाठी रविवारी साईआदित्य कृष्णमूर्ती त्यागराजन व आपल्या काही मित्रांसमवेत भंडारदरा धरणावर आला होता़ सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास व्यंकट पल्ली भंडारदरा धरणात अंघोळीसाठी उतरला़ मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला़ बेशुद्धावस्थेत असलेल्या पल्लीला त्याच्या मित्रांनी पाण्याबाहेर काढून उपचारासाठी शेंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले़ तेथून नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉ़ ठाकरे यांनी तपासून मयत घोषित केले़ या घटनेची राजूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
हैदराबादच्या तरुणाचा भंडारदरा धरणात बुडून मृत्यू
By admin | Updated: September 29, 2014 00:14 IST