शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

वाहनधारकांमध्ये वाद झाल्याने गाडी लावली राज्य महामार्गावर आडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 18:54 IST

पिंपळगाव बसवंत : वणी चौफुलीवरील भाजीपाला विक्रेते व वाहनधारकांची वेळोवेळी वाद होऊन वणी चौफुलीवरील वाहन कोंडीला कारणीभूत ठरत असून सोमवारी (दि.२८) वाहनधारकांध्ये पुन्हा वाद झाल्याने थेट राज्य महामार्गावरच गाडी आडवी लावली व वाहतूक कोंडी केली. त्यामुळे वणी चौफुली परिसरातील होणाऱ्या सततच्या वादाकडे प्रशासनाने लक्ष देऊन तोडगा काढावा अशी वाहनधारकांनी केली आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : भाजीपाला व्यवसायिक-वाहनधारकांचे वाद पुन्हा चव्हाट्यावर

पिंपळगाव बसवंत : वणी चौफुलीवरील भाजीपाला विक्रेते व वाहनधारकांची वेळोवेळी वाद होऊन वणी चौफुलीवरील वाहन कोंडीला कारणीभूत ठरत असून सोमवारी (दि.२८) वाहनधारकांध्ये पुन्हा वाद झाल्याने थेट राज्य महामार्गावरच गाडी आडवी लावली व वाहतूक कोंडी केली. त्यामुळे वणी चौफुली परिसरातील होणाऱ्या सततच्या वादाकडे प्रशासनाने लक्ष देऊन तोडगा काढावा अशी वाहनधारकांनी केली आहे.शिर्डी सुरत राज्य महामार्गाच्या व राष्ट्रीय महार्गाच्या वणी चौफुलीवर उड्डाणपुलाखाली गाडी उभी करण्यावरून वाद सुरू झाले त्यामुळे तेथील एका वाहनधारकांने थेट आपली पिकप गाडी राज्यमहार्गावर आडवी लावली, त्यामुळे परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. यावर स्थानिक नागरिकांनी गाडी काढण्यासाठी संबंधितांना विनंती केल्यावर त्यांनाच धक्काबुक्की करत वाद घातले. त्यामुळे येथील वाहनधारकाची गुंडागिरी चव्हाट्यावर आली असून प्रशासनाने त्यांना आवर घालावा अन्यथा शहरात हे वाहनधारक छोट्या छोट्या वादातून मोठे प्रकरण घडू शकते, अशी चर्चा पिरसरातील नागरीक व वाहनधारक करीत आहेत.नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत शहरातून राष्ट्रीय व राज्य महामार्ग गेल्याने शहराला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच द्राक्ष, टोमॅटो व कांद्याची मोठी मंडी असल्याने परराज्यातून हजारो व्यापारी, कामगार आणि वाहनांनामुळे शहर चोवीस तास गजबलेले असते. मात्र चौकाचौकात सुरु झालेल्या भाजीपाला विक्रीमुळे वाहनांची कोंडी होऊन शहरात चक्का जाम होत आहे. तरीही प्रशासन गप्प आहे, परिणामी वाहन धारकांनामध्ये वाद होऊन शहरात गोंधळ निर्माण होत आहे .त्याकरीता प्रशासनाने त्वरीत निर्णय घ्यावा व चौका चौकातील अनधिकृत गर्दी कमी करावी अशी विनंती करण्यात आली.आठवडे बाजार सुरळीत सुरू झाला आहे. त्यामुळे कोरोना काळात दररोज सुरू केलेला चौकाचौकातील भाजीपाला व्यवसाय बंद करावा म्हणजे शहरात होणारा गोंधळ तरी कमी होईल .- गणेश तिडके, पिंपळगाव बसवंत.वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करणारवणी चौफुलीवर अनधिकृत टपऱ्या व भाजीपाला विक्रेत्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला सुरळीत करण्यासाठी लवकरच निर्णय घेतला जाणार असून याबत वरिष्ठस्थरावर पाठपुरावा केला जात आहे. लवकरच उड्डाणपुलाखालील अनधिकृत व्यावसायिकांना चाप बसेल.- नवनाथ केदारे, टोल नाका व्यवस्थापक.वणी चौफुलीवरील गोंधळ थांबवापिंपळगाव बसवंत येथील वणी चौफुलीवरील भाजीपाला विक्रेत्यांची दादागिरी तसेच उड्डाणपुलाखाली टपऱ्यांमुळे वाहतूक कोंडी होऊन सात्यताने अपघात घडत असल्याने या घटनांमुळेच शहरातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात येत आहे.त्यामुळे येथील गोंधळ थांबवा- राजाभाऊ सोनवणे, अध्यक्ष, शिववाहतुक सेना.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीgram panchayatग्राम पंचायत