शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

प्रत्यक्ष सहभागामुळे ग्रामस्थांना पाणी बचतीचे महत्त्व पटले : सत्यजित भटकळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 01:11 IST

राज्यात सरक ारने गेल्या ४० वर्षांत पाणलोट क्षेत्र विकासापासून ते आत्ताच्या जलयुक्त शिवार योजनेपर्यंत विविध योजना राबविल्या. परंतु या योजना सरकारच्या यंत्रणेकडून राबविल्या जात असल्याने गावकऱ्यांचा त्यात थेट सहभाग नव्हता.

नाशिक : राज्यात सरक ारने गेल्या ४० वर्षांत पाणलोट क्षेत्र विकासापासून ते आत्ताच्या जलयुक्त शिवार योजनेपर्यंत विविध योजना राबविल्या. परंतु या योजना सरकारच्या यंत्रणेकडून राबविल्या जात असल्याने गावकऱ्यांचा त्यात थेट सहभाग नव्हता. परंतु, पानी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध गावांमधील ग्रामस्थांच्या सहभागातून जलसंवर्धनाचे काम उभे राहिले आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्याचे महत्त्व पटले असून, त्यामुळे हे सर्वजण पाणी बचतीकडे वळत असल्याचे प्रतिपादन पानी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी केले.नाशिकमध्येपाणी बचतीच्या प्रचार प्रसारासाठी आयोजित एका कार्यक्रमाला आले असताना त्यांनी सोमवारी (दि.११) पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. सत्यजित भटतळ म्हणाले, पानी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभरात सुरु असलेले जलसंवर्धनाचे काम वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांमधील गावकऱ्यांच्या कष्टावरच अवलंबून आहे. पानी फाउंडेशन केवळ त्यांना तांत्रिक प्रशिक्षण, मार्गदर्शनासोबत हे काम करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे मत सत्यजित भटकळ यांनी व्यक्त केले. राज्यात विविध सरकारांनी गेल्या ४० वर्षात अनेक प्रयत्न केले.स्पर्धेत गावांमध्ये आशादायी चित्रपानी फाउंडेशनला जलसंवर्धनात संपूर्ण यश मिळाले असे नाही. परंतु, स्पर्धेत सहभागी गावांमधील परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत आहे. यावर्षी राज्यात भीषण दुष्काळ असतानाही स्पर्धेत सहभागी चार हजार गावांपैकी ७० टक्के गावांमध्ये आशादायी चित्र असून, तेथे एक वर्षापूर्वी असलेल्या भूजलपातळीच्या तुलनेत चांगली अथवा समान स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी